खेड शिवापूर येथे हजरत पीर कमर अली दुर्वेश (रहे  )यांचा ८१५ वा उरूस उत्साहात सुरू 


खेड शिवापूर येथे हजरत पीर कमर अली दुर्वेश (रहे)यांचा ८१५ वा उरूस उत्साहात सुरू 

पुणे (खेड शिवापूर):

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील खेड शिवापूर येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जागतिक प्रतीक मानले जाणारे सुप्रसिद्ध दर्गाह हजरत पीर कमर अली दुर्वेश (रहे.) यांचा ८१५ वा वार्षिक उरूस , शुक्रवार 10 एप्रिल २०२६ पासून अत्यंत उत्साही वातावरणात सुरू होत आहे.

उत्सवाचे मुख्य कार्यक्रम:

येत्या पाच दिवसांत दर्गाह परिसरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:

संदल शरीफ: आज, बुधवार दि. ८ एप्रिल रोजी संदलच्या मिरवणुकीने उरुसाची भव्य सुरुवात होत आहे.

मुख्य उरूस: उद्या, शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी उरुसाचा मुख्य सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

शानदार कव्वाली: शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी सायंकाळी ६:०० ते रात्री १०:०० या वेळेत भव्य कव्वालीचा कार्यक्रम रंगणार आहे.

जियारत: शनिवार दि. ११ एप्रिल २०२६ रोजी जियारतचा कार्यक्रम पार पडेल.

कुराण खानी व फातिहा: सोमवार दि. १३ एप्रिल रोजी कुराण खानी आणि फातिहा पठण करण्यात येईल.

गुसुल शरीफ: सोमवार दि. १३ एप्रिल रोजी दुपारी ३:३० वाजता दर्गाह शरीफला गुसुल देण्यात येईल.

लंगर-ए-आम व महेफिल-ए-समा: सोमवार दि. १३ एप्रिल रोजी मगरिबच्या नमाजनंतर महाप्रसादाचे (लंगर) वाटप होईल आणि त्यानंतर ‘महेफिल-ए-समा’ आयोजित करण्यात आली आहे.

श्रद्धेचे केंद्र

हजरत पीर कमर अली दुर्वेश बाबांचा हा दर्गाह सर्वधर्मसमभावाचे महान प्रतीक म्हणून ओळखला जातो. येथील चमत्कारिक दगड आणि बाबांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक खेड शिवापूर येथे हजेरी लावतात. उरुसाच्या पार्श्वभूमीवर दर्गाह परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली असून भाविकांसाठी दर्गाह ट्रस्ट , खेडशिवापूर ग्रामपंचायत , मुजावर आणि प्रशासना तर्फे विशेष सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!