पुण्याच्या पावन भूमीत पेटणार व्यसनमुक्तीची मशाल; ‘विखारातून विजयाकडे’चा पोस्टर लाँच सोहळा लवकरच!

पुणे : “अहो, पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतात ते उगीच नाही! पण याच माहेरघरात आजकाल नशेत तर्रर्र होऊन फिरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे, हे पाहून आमचं काळीज तीळ-तीळ तुटतंय. या विखारी वास्तवाचे धिंडवडे काढण्यासाठी आणि तरुणाईला सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी प्रेस मीडिया लाईव्ह आणि मेहबूब सर्जेखान प्रोडक्शन घेऊन येत आहेत – ‘विखारातून विजयाकडे’!

विशेष म्हणजे, हा केवळ पाच-दहा मिनिटांचा देखावा नसून, तब्बल एका तासाचा हा लघुपट अमली पदार्थांच्या विळख्यातील दाहक वास्तव समाजासमोर मांडणार आहे. एका तासाच्या या प्रभावी कथानकातून नशेच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा आणि यशाचे शिखर गाठण्याचा मार्ग प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
या लघुपटाचा दिमाखदार पोस्टर लाँच सोहळा लवकरच पुण्यात संपन्न होणार आहे. व्यसनाच्या अंधाराला गाडून विजयाचा प्रकाश शोधणारा हा चित्रपट म्हणजे एक वैचारिक क्रांतीच ठरेल. पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात आता या सामाजिक जागृतीच्या सोहळ्याची भर पडणार आहे. लवकरच ठिकाण आणि वेळ जाहीर होईल, पण तोपर्यंत पुण्याचे रसिक प्रेक्षक या ऐतिहासिक क्षणाची चातकासारखी वाट पाहत आहेत, हे मात्र नक्की!”




























