लाखांची बिले फाडण्यापेक्षा शरीराची घाण काढा..! ‘प्रेस मीडिया लाईव्हचा आरोग्य-एल्गार..!
प्रेस मीडिया लाईव्ह :
“माणूस आजारी पडला की डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर त्याच्या खिशाला कात्री लावतो, हे चक्र आता थांबायला हवे ! शरीराचे देऊळ कचऱ्याने भरले असेल, तर तिथे आरोग्याचा देव कसा नांदणार?” अशा शब्दांत ‘प्रेस मीडिया लाईव्ह’चे धडाडीचे संपादक मेहबूब सर्जेखान सर यांनी समाजाच्या डोळ्यांत अंजन घातले आहे. व्यसनमुक्तीच्या यशस्वी लढाईनंतर आता त्यांनी मानवी शरीराच्या शुद्धीकरणासाठी ‘आरोग्य जागरूकता अभियान’ पुकारले आहे.
आता हॉस्पिटलची लूट चालणार नाही..!
आजच्या काळात आजार म्हणजे एक भयानक व्यापार झाला आहे. सामान्य माणसाने आयुष्यभराची पुंजी हॉस्पिटलच्या बिलात मोजायची आणि बदल्यात शरीरात औषधांचे विष भरायचे, हा कुठला न्याय? यावर रामबाण उपाय म्हणून ज्येष्ठ हेल्थ सल्लागार डॉ. सलीम आळतेकर, प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते महमद रफीक सर आणि अनिस जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘क्लींजिंग थेरपी’ (Cleansing Therapy) घराघरांत पोहोचवण्याचा विडा या टीमने उचलला आहे.
काय आहे हे ‘क्लींजिंग’ अस्त्र..?
ज्याप्रमाणे घराचा कोपरा न कोपरा साफ केल्याशिवाय घर लख्ख दिसत नाही, तसेच शरीराच्या आत साचलेली वर्षानुवर्षांची घाण आणि टॉक्सिन्स बाहेर काढल्याशिवाय आरोग्य लाभणार नाही.
रोग होण्यापूर्वीच त्याचा बंदोबस्त : रोग झाल्यावर धावपळ करण्यापेक्षा, तो होऊच नये यासाठी शरीर सज्ज करणे.
मुळासकट निराकरण : आजाराची तीव्रता कमी करून मानवाचे आयुर्मान वाढवणे.
निरामय जीवन : औषधांच्या कुबड्या फेकून देऊन स्वतःच्या पायावर निरोगी आयुष्य जगणे.

महाराष्ट्रात आरोग्याची लाट..!
या आरोग्य मोहिमेला आता वेग घेतला असून, लवकरच पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांत या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. हे केवळ एक प्रदर्शन नसून, ती एक ‘आरोग्य क्रांती’ आहे, असे उद्गार यावेळी काढण्यात आले.
आवाहन: “वेळ निघून गेल्यावर डोळे पुसण्यापेक्षा, वेळ असतानाच शरीराची सफाई करा,” असे आवाहन ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ तर्फे करण्यात आले आहे. या अभियानाबद्दल अधिक माहितीसाठी आणि सहभागी होण्यासाठी तातडीने संपर्क साधावा.
Dr Salim Alatekar CTP health Adviser & Camp Organiser 9022356437




























