पँथरचा पंजा सरसावला! तीन जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; वसईत क्रांतीचे रणशिंग फुंकले!


वसईच्या भूमीत निळ्या वादळाचा कडाडाट; ॲड. किरणराव मोरे आणि सहकाऱ्यांच्या प्रवेशाने प्रस्थापितांचे धाबे दणाणले!

 

वसई (प्रतिनिधी): ज्यांच्या नसानसात अन्यायाविरुद्ध लढण्याचे रक्त सळसळतेय आणि ज्यांच्या मनगटात भीमसैनिकाचे बळ आहे, अशा हजारो कार्यकर्त्यांनी रविवारी वसईत इतिहास घडवला! **’पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेने’**चा हा सोहळा म्हणजे केवळ एक पक्षप्रवेश नव्हता, तर तो शोषितांच्या संघर्षाचा नवा अध्याय होता. मुंबई, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांच्या महासागराने वसईचे ‘विश्वासम्राट बुद्ध विहार’ अक्षरशः ओसंडून वाहत होते.

मैदान मारले पँथरने.!
पँथर आर्मीचे प्रमुख संतोष आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. अरुणजी मेढे यांच्या अध्यक्षतेखाली हा एल्गार पुकारण्यात आला. “आता अन्याय सोसणार नाही आणि अन्यायाला माफीही देणार नाही,” असा जळजळीत इशाराच जणू या व्यासपीठावरून देण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्रीय सल्लागार उमेश जामसंडेकर यांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांच्या मनात क्रांतीची ठिणगी टाकली.
नवी फळी, नवा बाणा..!

या सोहळ्यात संघटनेने आपल्या नव्या शिलेदारांच्या नियुक्त्या जाहीर करून रणांगण सज्ज केले:

ॲड. किरणराव मोरे: महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष (एक अभ्यासू आणि झुंजार नेतृत्व)

विनोद पवार: पालघर जिल्हाध्यक्ष (पालघरच्या मातीतील लढवय्या आवाज)

ॲड. सचिन गुप्ता: महाराष्ट्र प्रदेश सचिव

राजेश गोडांबे: विरार शहर अध्यक्ष

रणरागिणींचा झंझावात!
केवळ पुरुषच नव्हे, तर पँथरच्या वाघिणींनीही या सोहळ्यात आपली ताकद दाखवून दिली. ॲड. किरण म्हात्रे (महासचिव, महिला आघाडी) आणि अकिला शेख (ठाणे जिल्हाध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली महिलांची मोठी फळी संघटनेत सामील झाली.

“हा केवळ आकडा नाही, तर हे परिवर्तन आहे! जेव्हा पँथर आपला पंजा सरसावतो, तेव्हा अन्यायाचे डोंगरही थरथर कापतात. वसईत फुंकलेले हे रणशिंग आता मंत्रालयाच्या दारापर्यंत पोहचल्याशिवाय राहणार नाही!”

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!