छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि कै मीनाताई ठाकरे यांच्या भव्य दिव्य उद्यानासाठी शिवसेना शहरप्रमुखाचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन.
देहुरोड दि :-छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि कै मीनाताई ठाकरे यांच्या भव्य दिव्य उद्यानासाठी शिवसेना शहरप्रमुखाचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन देण्यात आले
देहुरोड शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने देहुरोड बाजार पेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक यांचे भव्य दिव्य स्मारक आणि कै. मीनाताई ठाकरे यांच्या उद्यानासाठी नीधी मंजूर करून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि कै मीनाताई ठाकरे याच्या उद्यान भव्य दिव्य बनविण्यात यावा यासाठी खासदार नीधीतुन हे काम करण्यात यावे यासाठी देहुरोड शहर प्रमुख संदीप बालघरे व शहराध्यक्ष दीपक चौगुले यांच्या शिष्टमंडळाने मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदनाद्वारे केली आहे. मुंबई पुणे महामार्ग लगत कै मीनाताई ठाकरे उद्यान साठी देहुरोड कॅंन्टोंन्मेंट बोर्डाने यासाठी जागा मंजूर केली आहे पण नीधीअभावी हे उद्यान असेच धुळखात पडले आहे अनेक वेळा कॅन्टोन्मेंट बोर्डात पाठपुरावा करून देखील दोन्ही गोष्टी होत नसल्याने दोन्ही शहरप्रमुखाने आपल्या शिष्टमंडळालासह खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन दिले
यावेळी निवेदन स्वीकारताना श्रीरंग बारणे यांनी याबाबत लवकरच निर्णय घेतले जाईल तसेच कॅन्टोन्मेट बोर्डात याबाबत बैठक घेऊन समस्या पुर्ती करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विजय पवार ॶॅड. कृष्णा दाभोळे सागर लांडगे, सनी कदम, संजय पिंजण, शशिकांत सप्पागुरु, मोरेश्वर घाडगे, सुरेश बागव हे उपस्थित होते.






























