बदनामीचा बाजार उठवणार..! लोकशाहीच्या नावाखाली चाललेला हा ‘डिजिटल नंगानाच’ पँथर आर्मी आता मोडून काढणार..!
पुणे/सोलापूर :
महाराष्ट्राच्या मातीत सामाजिक क्रांतीचा अंगार फुलवणाऱ्या आणि शोषितांच्या न्यायासाठी रात्रंदिवस एक करणाऱ्या नेतृत्वावर सध्या ‘डिजिटल’ चिखलफेक करण्याचा एक घाणेरडा धंदा तेजीत आला आहे. पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक प्रमुख आणि झुंजार पत्रकार श्री. संतोष एस. आठवले यांच्यासारख्या लढाऊ व्यक्तिमत्त्वावर सोशल मीडियाच्या आडून जे निलाजरे वार केले जात आहेत, त्याने आता पँथरच्या संयमाचा बांध फुटला आहे. या ‘डिजिटल नंगानाचाचा’ बाजार उठवण्यासाठी पँथर आर्मीने आता कंबर कसली असून, संपूर्ण राज्यभर संतापाचा वणवा पेटला आहे!
तोंड सुटलंय की गटार..?
वसईच्या एका महिलेने फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूबच्या पडद्याआड लपून संतोष आठवले यांच्याविरोधात प्रक्षोभक आणि अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जी गरळ ओकली आहे, ती पाहिल्यावर प्रश्न पडतो की, ही लोकशाही आहे की मोगलाई? कोणत्याही पुराव्याशिवाय एखाद्याच्या वैयक्तिक चारित्र्यावर शिंतोडे उडवणे आणि संघटनेची प्रतिमा मलीन करणे हा जो काही नीच प्रकार सुरू आहे, त्याचा पँथर स्टाईलने हिशोब चुकता करण्याची वेळ आता आली आहे. कुणीही उठायचे आणि तोंडाला येईल ती घाण सोशल मीडियावर ओकायची, हा प्रकार म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसून तो सरळ सरळ कायद्याचा खून आहे!
प्रशासनाला पँथरचा ‘अखेरचा’ इशारा..!
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुण्यापासून सोलापूरपर्यंत आणि पालघरपासून पारनेरपर्यंत निवेदनांचा पाऊस पडत आहे. पँथरच्या सैनिकांनी आता रस्त्यावर उतरून प्रशासनाचे कान उपटायला सुरुवात केली आहे.
पुण्यात प्रदेश संघटक लक्ष्मीकांत कुंबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे डोळे उघडले असून, या ‘डिजिटल क्राईम’ करणाऱ्या महिलेवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची ठाम मागणी केली आहे.
सोलापूर मध्ये विनोद बनसोडे आणि राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मुळे यांनी पोलीस प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत.
पालघरमध्ये आशा मोरे आणि पारनेर मध्ये ज्योतीताई झरेकर या रणरागिणींनी रणशिंग फुंकून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांपर्यंत ही तक्रार पोहोचवली आहे.
आता माघार नाही, थेट प्रहार..!
ही लढाई केवळ एका व्यक्तीची उरलेली नाही, तर ती सामाजिक चळवळीचे खच्चीकरण करणाऱ्या वृत्तीविरुद्ध आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याचा (IT Act) धिंडवडा काढणाऱ्या अशा प्रवृत्तींना जर वेळीच आवर घातला नाही, तर उद्या कोणताही टिनपाट उठून थोर समाजसेवकांवर चिखलफेक करेल. जर सायबर सेलने या महिलेच्या मुसक्या आवळून तिला तुरुंगाची हवा दाखवली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर पँथर आर्मी असा काही एल्गार पुकारेल की, या बदनामी करणाऱ्या प्रवृत्तींना पळता भुई थोडी होईल!
लक्षात ठेवा, संतोष आठवलेंच्या पाठीशी उभा असलेला हा पँथर आता शांत बसणार नाही. या ‘बदनामीच्या बाजाराला’ आता स्मशानकळेची वाट दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही!



























