रोखठोक पत्रकारितेने अधिकाऱ्यांना वठणीवर आणणाऱ्या मुजावर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; अकोल्यात पेढे वाटप
पुणे ( चंद्रशेखर पात्रे):
ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार तनवीर मुजावर यांचा वाढदिवस विविध जिल्ह्यांमध्ये पदाधिकारी, सदस्य आणि नागरिकांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
अकोला येथील अशोक वाटिका येथे असोसिएशनच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थितांना मिठाई आणि पेढे वाटून मुजावर यांना दीर्घायुष्याच्या व सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय संघटन सचिव संघपाल सिरसाट आणि जिल्हाध्यक्ष रवींद्र गवई यांनी तनवीर मुजावर यांच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. तनवीर मुजावर हे गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांचा मोठा हातखंडा असून, त्यांनी नेहमीच रोखठोक, निर्भीड आणि निष्पक्ष बातम्या लावून अनेक अधिकाऱ्यांना वठणीवर आणले आहे. आपल्या लेखणीच्या व कार्याच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटकातही संघटना वाढवण्याचे मोठे काम केले आहे.
कर्नाटक, विजापूर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे अशा विविध भागांत त्यांनी आपल्या कामाची मोठी छाप पाडली आहे. विशेषतः पुणे ते लोणावळा दरम्यानच्या सिग्नलवर भीक मागणाऱ्या लहान बालकांच्या बाबतीत त्यांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या माध्यमातून मोठी कामगिरी केली. हजारो बालकांची सुटका करून त्यांना बालसुधारगृहात पाठवण्याचे आणि त्यांचे जीवन उज्ज्वल करण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे, अशा शब्दांत उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
अशोक वाटिकेतील कार्यक्रमात ‘बार बार दिन ये आये, बार बार दिल ये गाए’ हे गीत सादर करत नागरिकांना पेढे वाटण्यात आले. या कार्यक्रमास प्रदेश सचिव राहुल जाधव, जिल्हाध्यक्ष रवींद्र गवई, महासचिव राजविलास वानखडे, सचिव राजेश खांडेकर, संघटन सचिव प्रभाकर कवडे, कोषाध्यक्ष संजय मेश्राम, महिला जिल्हाध्यक्ष हर्षा खंडारे, करुणा सिरसाट, मंदा इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार जिल्हा सचिव राजेश खांडेकर यांनी मानले. तनवीर मुजावर यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता अशा विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, अशी माहिती राष्ट्रीय संघटक सचिव तथा ‘उपेक्षित वऱ्हाड’चे मुख्य संपादक संघपाल सिरसाठ यांनी **द प्रेस मीडीया लाईव्ह**चे जिल्हा प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे यांना दिली.



























