कोल्हापूरच्या कला संस्कृतीत सुवर्णक्षण; ‘हृदयस्पर्श’ सोहळ्याचा दिमाखदार सोहळा संपन्न!


कोल्हापूरच्या कला संस्कृतीत सुवर्णक्षण ; ‘हृदयस्पर्श’ सोहळ्याचा दिमाखदार सोहळा संपन्न..!

कोल्हापूर :  कोल्हापूरच्या कलापरंपरेत मानाचा तुरा रोवणारा आणि रंगकर्मींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ‘हृदयस्पर्श कौतुक अभिनंदन सोहळा’ नुकताच उत्साहात पार पडला. अतिशय देखणे, नीटनेटके आणि रेखीव नियोजन असलेला हा सोहळा कोल्हापूरच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अविस्मरणीय सुवर्णक्षण ठरला.

हृदयस्पर्शचे सर्वेसर्वा पद्माकर कापसे आणि सौ. पद्मिनी कापसे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा कार्यक्रम उपस्थित प्रत्येकाला एक सात्विक आणि प्रसन्न अनुभव देऊन गेला. सलग दोन तास रंगलेला हा सोहळा म्हणजे जणू इंद्रधनुषी रंगांची उधळण आणि रसिक मनाला गंधित करणारा सोहळा ठरला. राज्य नाट्य स्पर्धेतील विजेते कलाकार, तंत्रज्ञ आणि सहभागी संघांना यावेळी सन्मानित करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली.

या सोहळ्याला सावली केअरचे डॉ. देशपांडे, प्रसिद्ध उद्योजक देवेंद्र दिवाण, संकल्पपॅथीचे जनक डॉ. कदम, व्यसनमुक्त अभियानाचे डॉ. सलीम आळतेकर आणि ‘BNews’ चे ताज मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण सभागृह रसिकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होते, जे या कार्यक्रमाच्या यशाची सर्वात मोठी पावती ठरली.

सोहळ्याची वैशिष्ट्ये आणि मान्यवरांची उपस्थिती

अविस्मरणीय आयोजन: कापसे दांपत्याच्या नियोजनाचे आणि सूत्रबद्ध सादरीकरणाचे सर्वत्र कौतुक.

रंगकर्मींचा गौरव: राज्य नाट्य स्पर्धेतील विजेत्या संघांचा आणि कलाकारांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन दिले.

उपस्थित मान्यवर: डॉ. देशपांडे, देवेंद्र दिवाण, डॉ. कदम, डॉ. सलीम आळतेकर, रियाज मुल्लाणी यांची प्रमुख उपस्थिती.

अभूतपूर्व प्रतिसाद: रसिक प्रेक्षक आणि रंगकर्मींच्या मोठ्या उपस्थितीमुळे सभागृह ‘हाऊसफुल्ल’.

कोल्हापूरच्या रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व स्तरांतून हृदयस्पर्श परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

 


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!