अभिनेते महंमद रफिक मांगुरे सर यांचा पडद्यावर जलवा! ‘रपाटा’ चित्रपटाच्या टीझरला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद; संपादक मेहबूब सर्जेखान यांच्याकडून विशेष सत्कार


अभिनेते महंमद रफिक मांगुरे सर यांचा पडद्यावर जलवा !

रपाटा’ चित्रपटाच्या टीझरला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद ;

संपादक मेहबूब सर्जेखान यांच्याकडून विशेष सत्कार

इचलकरंजी : येत्या २ जानेवारी 2026  रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘रपाटा’ या मराठी चित्रपटाची सध्या संपूर्ण राज्यात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाचा टीझर लाँच झाल्यापासून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू असून, टीझरमधील दमदार सादरीकरण पाहून अखंड महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रपाटा’च्या टीझरने सर्वांना झपाटले!

मराठी चित्रपट ‘रपाटा’चा टीझटीझर प्रदर्शित होताच त्याने प्रेक्षकांना अक्षरशः झपाटले आहे. यातील हृदयस्पर्शी दृश्ये आणि अभिनयाची जुगलबंदी पाहून संपूर्ण महाराष्ट्रातून चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच ‘प्रेस मीडिया लाईव्ह’तर्फे आयोजित आगामी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अभिनेते मा. महंमद रफिक मांगुरे सर हे ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून उपस्थित राहणार आहेत.

शिक्षकाची भूमिका ठरतेय आकर्षणाचे केंद्र

या चित्रपटात प्रमुख अभिनेते मा. महंमद रफिक मांगुरे सर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. टीझरमध्ये त्यांनी साकारलेली शिक्षकाची व्यक्तिरेखा अत्यंत प्रभावी वाटत असून, त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पडत आहे. त्यांची संवादफेक (डायलॉग डिलिव्हरी), चेहऱ्यावरील बोलके हावभाव आणि नजरेतील जरब यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांना रसिक प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे.

संपादक मेहबूब सर्जेखान यांच्याकडून सदिच्छा भेट

या यशाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रेस मीडिया लाईव्ह’चे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांनी अभिनेते महंमद रफिक मांगुरे सर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांचा विशेष सत्कार केला. यावेळी सर्जेखान यांनी मांगुरे सरांच्या कलेचे कौतुक करत त्यांना ‘रपाटा’ चित्रपटाच्या भव्य यशासाठी शुभेच्छा दिल्या.

मालिकांनंतर आता मोठ्या पडद्यावर धमाका

महंमद रफिक मांगुरे सर यांनी यापूर्वी अनेक मराठी मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र, ‘रपाटा’मधील त्यांची ही शिक्षकाची भूमिका त्यांच्या अभिनय प्रवासातील एक सुवर्णक्षण ठरणार आहे. २ जानेवारी 2026 ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!