मधुमेहमुक्त भारतासाठी अनिस जमादारांची भीष्म प्रतिज्ञा ; आता गोळ्यांना करा टाटा, अन् आरोग्याला म्हणा ‘आधार’!

लेखक मेहबूब सर्जेखान ज्येष्ट पत्रकार :
‘आधार’… हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभं राहतं ते संसाराचं छप्पर, म्हातारपणाची काठी आणि आजच्या काळातलं ते महत्त्वाचं सरकारी कार्ड! पण मित्रांनो, सध्याच्या काळात माणसाचा खरा आधार हिरावून घेतलाय तो या ‘मधुमेह’ नावाच्या गोड शत्रूने. शरीरात साखर वाढली की जगण्यातला गोडवाच संपतो. पण आता चिंता सोडा! कारण सांगलीच्या भूमीतून एक रणशिंग फुंकलं गेलं आहे. अनिस जमादार नावाच्या एका तडफदार तरुणाने या रोगाचा कायमचा काटा काढण्यासाठी कंबर कसली आहे!
साखरेच्या राक्षसाचा कर्दनकाळ.!
आज प्रत्येक घरात कुणी ना कुणी मधुमेहाने त्रस्त आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत गोळ्यांचा खच पडलेला असतो. पण “हे किती दिवस चालणार?” असा सवाल विचारत अनिस जमादार यांनी ‘आधार नशा व मधुमेह मुक्त अभियान’ सुरू केलं आहे. ही केवळ एक मोहीम नाही, तर ही एक ‘भीष्म प्रतिज्ञा’ आहे—मधुमेह असलेल्या रुग्णांना या विळख्यातून कायमचं मुक्त करण्याची!
तरुण रक्ताचा धडाका..!
आम्हाला अशा तरुणांचा सार्थ अभिमान वाटतो. ज्या वयात तरुण मुलं वाममार्गाला लागतात किंवा केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार करतात, त्या वयात अनिसने समाजहित जपलं आहे. देशाला आज अशाच जिद्दी तरुणांची सक्त गरज आहे. ज्याला मधुमेहाने ग्रासलंय, त्यानं आता घाबरून न जाता या ‘आधार’ अभियानाचा हात धरायला हवा.
प्रेस मीडिया लाईव्ह ची तोफ गरजली:
“नुसतं ‘आधार कार्ड’ खिशात असून उपयोग नाही, शरीराला आरोग्याचा ‘आधार’ मिळणं जास्त महत्त्वाचं आहे! अनिस जमादारांनी घेतलेली ही झेप म्हणजे साखरेच्या विळख्यात अडकलेल्या सामान्य माणसासाठी संजिवनीच ठरणार आहे.”
चला, मधुमेहाचा पाडाव करूया..!
ज्यांना हा आजार आहे किंवा ज्यांना यातून बाहेर पडायचं आहे, त्यांनी वेळ न घालवता अनिस जमादार यांच्याशी संपर्क साधावा. हीच ती वेळ आहे या व्याधीला ‘टाटा’ म्हणण्याची!
नाव: अनिस जमादार
संपर्क: 📞 +91 77981 09612
सांगलीचा हा झंझावात आता महाराष्ट्रभर पसरू दे, हीच सदिच्छा!
https://chat.whatsapp.com/BmIyGPRNyOIAP7LPraRyCj?mode=gi_t


























