आम आदमी पक्षाचे तीव्र जन आक्रोश आंदोलन
पुणे: पुण्यातील सर्वात अधिक लोकसंख्या असलेल्या सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयात सावळा गोंधळ सुरू आहे. सहाय्यक आयुक्तांसह अधिकारी कर्मचारी गायब होत असल्याने समस्यांच्या तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांना महिनोन्महिने दाद मिळत नाही त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत .
सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयात शासकीय वेळात अधिकारी कर्मचारी गैरहजर हजर असल्याच्या निषेधार्थ पुणे शहर आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र जन आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या बाबत आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, खडकवासला, धायरी दळवीवाडी नांदोशी पासुन पर्वती जनता वसाहत दांडेकर पुला पर्यंतचा वीस लाख लोकसंख्येचा परिसर सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात आहेत. पालिकेच्या विविध विभागांचे प्रमुखांसह अधिकारी कर्मचारी क्षेत्रिय कार्यालयात नियुक्त करण्यात आले आहे असे असले तरी कार्यालयाच्या प्रमुख सहाय्यक आयुक्तांसह अधिकारी कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत त्यामुळे पथदिवे, पाणी पुरवठा, रस्ते, कचरा आदी समस्या दूर करण्यासाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.कार्यालयात जाऊन समक्ष भेटून तक्रार दाखल करता येत नाही.विचारणा केली असता अधिकारी फिरतीवर गेले आहेत अशी उत्तरे देऊन नागरिकांना माघारी पाठवत आहेत.
————–
अधिकारी दाखवा एक हजार रुपये मिळवा:
सिहंगड रोड क्षत्रिय कार्यालयातील जवळपास सर्वच सर्व अधिकारी , कर्मचारी पुर्ण वेळ कार्यालयात थांबत नाहीत. स्वतः सहायक आयुक्त या कधितरी येऊन निघून जातात त्यामुळे इतर अधिकारी कर्मचारी कार्यालयात फिरकतही नाही. अनेक जण आपल्या अलिशान बंगल्यात बसून मौजमजा करतात. वार्तानुकुलित महागड्या कार मधुन पर्यटन करतात असी तक्रार आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी केली आहे ते म्हणाले, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयात अधिकारी कर्मचारी दाखवा आणि एक हजार रुपयांचे बक्षीस मिळवा असे फलक लावण्यात येणार आहेत.
कार्यालयाच्या इमारतीखाली असलेले सुरक्षा रक्षक चौकशी करण्यासाठी गेल्यावर नागरिकांच्या अंगावर गुरगुरत धाऊन जातात त्यामुळे महिला, जेष्ठ नागरिक तक्रार न करताच निघून जातात
—-++—-
धनंजय बेनकर म्हणाले, अनेकदा सकाळी ११ वाजता क्षेत्रिय कार्यालयात गेले तरी अजून मॅडम आल्या नाहीत. साहेब आले नाहीत अशी उत्तरे मिळतात.. दुपारी अडीच तीन वाजताही अशीच उत्तरे मिळतात. होते आत्ताच गेले.
सध्या निवडणुकीच्या कामामुळे अधिकारी फोन घेत नाहीत. गेल्या एक वर्षा सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयात गंभीर प्रकार सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांना कोणी वाली नाही असे चित्र आहे.






























