बापाच्या संघर्षाचं लेकीने केलं सोनं ; माळव्यांच्या वेदिकाचा ९२.४० टक्क्यांचा सणसणीत ‘छक्का’!


बापाच्या संघर्षाचं लेकीने केलं सोनं ; माळव्यांच्या वेदिकाचा ९२.४० टक्क्यांचा सणसणीत ‘छक्का’!

अहो, समाजसेवेचा ‘विडा’ उचलला की घरादारावर तुळशीपत्र ठेवावं लागतं, असं म्हणतात. बाप जेव्हा समाजाच्या पोरांना यशाच्या शिखरावर नेण्यासाठी रात्रंदिवस रानोमाळ धावत असतो, तेव्हा त्याच्या स्वतःच्या घरात काय घडतंय, याकडे लक्ष द्यायला त्याला सवड नसते. पण, याच ‘निस्वार्थ धावपळीत’ आणि ‘निरागस धडपडीत’ एक क्रांती घडली आहे! अनिलराव माळवी यांच्या समाजसेवेच्या धकाधकीत, त्यांची सुकन्या वेदिका हिने कोणत्याही तक्रारीशिवाय अभ्यासाचं मैदान असं काही गाजवलंय की, पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत!

दहावीच्या निकालात वेदिकाने ९२.४०% गुण मिळवून केवळ यश मिळवलं नाही, तर प्रतिकूल परिस्थितीच्या छाताडावर विजयाची गुढी उभारली आहे. बापाला घरापेक्षा समाजाची ओढ जास्त, घरात अभ्यासासाठी शांतता मिळेलच याची खात्री नाही, अशा वातावरणात या पोरीने स्वतःच्या जिद्दीवर हा निकाल खेचून आणला आहे. आई-बापाचा संघर्ष ती नुसती पाहत नव्हती, तर तो काळजावर कोरत होती आणि आज त्याच संघर्षाचं मोल तिने आपल्या कर्तृत्वाने दिलं आहे.

हे यश म्हणजे निव्वळ आकड्यांची खेळ नव्हे..! तर हा शिवरायांचा बाणा, सावित्रीमाईंचा आशीर्वाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक वारशाचा हुंकार आहे. ज्या शिक्षकांनी तिला अक्षराचं शस्त्र दिलं, ज्या शाळा व्यवस्थापनाने पाठबळ दिलं आणि ज्या मित्र-हितचिंतकांनी तिला सावरलं, त्या सर्वांच्या चरणी हे यश कृतज्ञतेने अर्पण करून अनिलरावांनी खऱ्या अर्थाने ‘मोठेपण’ जपलं आहे.

दुसऱ्यांच्या मुलांवर पोटच्या गोळ्यासारखं प्रेम करणाऱ्या आणि समाजाच्या कल्याणासाठी झिजणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला वेदिकाने दिलेली ही अनोखी ‘सलामी’ आहे.

शाब्बास वेदिका..! तुझ्या या झंझावाताला संपूर्ण महाराष्ट्राचा मानाचा मुजरा!

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!