कोरल वाडी, आपटा तालुका पनवेल यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे आमरण उपोषण स्थगित

कोरल वाडी, आपटा तालुका पनवेल यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. उपविभागीय अधिकारी पनवेल पवन चांडक यांच्या हस्ते आदिवासी कुटुंबांना रेशन कार्डचे वाटप*करण्यात आले असून चार दिवसात पाईप लाईन टाकून कोरल वाडीवर पाणी पोहोचणार
दिनांक 4/11/2025 रोजी स्वतः उपविभागीय अधिकारी रस्त्याचा आढावा घेऊन रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश देणार तसेच आदिवासी जमिनीसंदर्भातील प्रलंबित असलेल्या रेस्टॉरेशन ऑर्डर्स नायब तहसीलदार शेलार यांनी आदिवासी कुटुंबांना दिल्या
सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर अध्यक्ष ग्रामविकास संवर्धन सामाजिक संस्था यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार दिनांक 29/10/2025 रोजी आयोजीत करण्यात आलेल्या आमरण उपोषणा च्या बैठकीमध्ये आपटा ग्रामपंचायत हद्दीतील जल जीवन मिशन योजनेतील पाणी पुरवठा योजने अंतर्गत असलेल्या कोरल वाडी आणि इतर वाड्यांच्या पाईप लाईन चे काम पुढील चार दिवसात पूर्ण करून देण्याचे आश्वासन पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता पनवेल यांनी केले. दिनांक 4/11/2025 रोजी स्वतः उप विभागीय अधिकारी पवन चांडक यांच्याहस्ते त्याचे लोकार्पण होणार आहे. कोरळ वाडी वरील सर्व कुटुंबांचे अंत्योदय योजनेतील पिवळे रेशन कार्ड देण्यात आले तसेच राहिलेल्या कुटुंबांचे रेशन कार्ड थोड्या दिवसात देण्यात येणार आहे. कोरळ वाडीला जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था पाहण्यासाठी उप विभागीय अधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या टीम सोबत पाहणी दौरा ठेवला असून त्याच दिवशी योग्य ते आदेश दिले जातील असे आश्वासन देण्यात आले. सदरहू बैठकीस उप अभियंता पाणी पुरवठा विभाग, नायब तहसीलदार पुरवठा विभाग, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील भोवड,उपस्थित होते. ॲड राजेंद्र मढवी यांनी सर्वांचे आभार मानले
माहिती अधिकार कार्यकर्ते काशिनाथ जाधव , दिलीप मोरे , सुभाष मेहतर, सुभाष फडके , वाजिद शेख , रोहित ढमाल , गणेश थोरवे, लाडीवली ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील , ग्रामस्थ बी. एस. कुलकर्णी , गुरुदास वाघे ,संतोष पवार आदी कोरळवाडी , आपटा ग्रामस्थ उपस्थित होते.





























