
इचलकरंजी – चांदतारा मस्जिदच्या अभ्यासिकेत सलोख्याची दिवाळी या सद्भाव मंच अंतर्गत उपक्रमाला प्रतिसाद देत संविधान परिवारने दिवाळी फराळ कार्यक्रम संपन्न केला.
कार्यक्रमाचे सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत इम्रान हावेरी यांनी स्वागत केले.प्रास्ताविक करताना संवेदना फेलो तथा राष्ट्र सेवा दलाचे संघटक रोहित दळवी यांनी कार्यक्रमामागील उद्देश विषद करणारी मांडणी केली. अभ्यासिकेचे संचलन करणारे हाजी सादिक जमादार यांनी या उपक्रमाचे स्वागत करत यातून हिंदू मुस्लीम ऐक्याचा धागा दृढ होत जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
सलोखा सद्भावाचे महत्त्व सांगताना जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाचे राज्य समन्वयक संजय रेंदाळकर म्हणाले,” हिंदू मुस्लीम ऐक्याची गरज पुर्वीपेक्षा आज अधिक आहे आणि यांच्यातील फुटीमुळे किंवा विद्वेष पसरवणेमुळे कोणाचा फायदा होतो तो लोकांसमोर आणण्याची वेळ आली आहे. विद्वेषाचे विष पुढील पिढीपर्यंत जाणार नाही यासाठी अशा एकत्र आणणारा, एकमेकाला समजून घेणेचा, संस्कृती समजून घेणेचा अवकाश पुन्हा निर्माण करण्याची गरज आहे.”
यावेळी सृजन प्रकाशनवतीने अभ्यासिकेला ग्रंथभेट दिली. तसेच अभ्यासिकेतील तरुणाईला राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ समजावून सांगणारे यदुनाथ थत्ते लिखित प्रतिज्ञा पुस्तक भेट देण्यात आले. जाफर मुजावर यांनी सांप्रत परिस्थितीत सद्भावासोबत अन्यायाविरुद्ध आवाज उठवणेचीही तयारी ठेवावी लागेल असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्र सेवा दल इचलकरंजीचे अध्यक्ष अनिल होगाडे होते. यानंतर सर्वांनी फराळाचा आनंद घेतला.
सदर कार्यक्रमास मुबारक मुजावर , अबू पानारी, हाजी दिलावर शेख, मौलाना अयाज नाईक,इकबाल देसाई, इब्राहिम मुजावर, सरफराज खलिफा,शरद वास्कर, शहानुर कमालशाह , प्रफुल्ल आवळे, इब्राहिम मुजावर , अशोक वरुटे, अॅड. तौफिक नाईकवाडे ,साद चांदकोटी, हाजी वाजीद तासगावे , सरफराज खलिफा , शब्बीर शिरोळे,ओम कोष्टी, मखतूम जमादार , जुबेर मागलेकर , तौफिक कोठिवाले,निलेश बनगे, लुकमान समडोळे फिरोज जमादार,आणि दामोदर कोळी आवर्जून उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंयोजन प्रा. अमित कोवे यांनी केले. शहानूर कमालशहा यांनी आभार मानले.





























