डॉ. सलीम आळतेकर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव; ‘प्रेस मीडिया लाईव्ह’तर्फे जीवन गौरव पुरस्कार प्रदान !
समाजहितासाठी आयुष्य वेचणाऱ्या निस्वार्थ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने, ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ या नामांकित वृत्त संस्थेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित ‘जीवन गौरव पुरस्कार’ यावर्षी डॉ. सलीम आळतेकर यांना प्रदान करण्यात आला. एका भव्य सोहळ्यात, समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. आळतेकर यांना सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यात डॉ. आळतेकर यांच्यासह इतरही काही मान्यवरांना त्यांच्या विशेष कार्यासाठी गौरविण्यात आले. डॉ. आळतेकर यांच्या दीर्घकालीन सामाजिक योगदानाची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आल्याने, सर्वच स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हा पुरस्कार सहभागी घटकांचा सन्मान : डॉ. सलीम आळतेकर
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. सलीम आळतेकर यांनी आपल्या यशाचे श्रेय सहकाऱ्यांना दिले. ते म्हणाले, “कोणतेही कार्य एका व्यक्तीच्या माध्यमातून पूर्ण होत नाही. त्यासाठी सोबतीने कार्य करणाऱ्या नातेवाईकांची, मित्रांची आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची साथ मिळणे आवश्यक असते. त्यामुळे हा पुरस्कार वैयक्तिक नसून या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या सर्व घटकांचा आहे. मी हा सन्मान माझ्या सर्व हितचिंतकांना समर्पित करतो.”
नूतन वर्षाचे औचित्य आणि सामाजिक संदेश
पुरस्काराचे औचित्य साधून डॉ. आळतेकर यांनी उपस्थितांना आणि नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांनी एक प्रेरणादायी व्हिडिओ देखील प्रसारित केला आहे. “स्वतःसाठी आपण खूप खर्च करतो, पण समाजाला दिशा देणारा विचार पाहण्यासाठी प्रत्येकाने थोडा ‘डाटा’ खर्च करून हा व्हिडिओ जरूर पहावा. यातून मिळणारा संदेश प्रत्येकासाठी महत्त्वाचा ठरेल,” असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजना बद्दल त्यांनी ‘प्रेस मीडिया लाईव्ह’च्या संयोजकांचे मनापासून आभार मानले. डॉ. आळतेकर यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कार्याला मिळालेली एक महत्त्वाची पोचपावती मानली जात आहे.
!


























