नव्या बदलासाठी सुशिक्षित नेतृत्व; प्रभाग क्र. ६ मधून फिरदौस जहीरअहमद मुजावर निवडणुकीच्या रिंगणात


नव्या बदलासाठी सुशिक्षित नेतृत्व; प्रभाग क्र. ६ मधून फिरदौस जहीर अहमद मुजावर निवडणुकीच्या रिंगणात

मिरज: महापालिकेच्या स्थापनेपासून समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या प्रभाग क्रमांक ६ च्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन, माजी नगरसेवक पै. रफिक मुजावर यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी सौ. फिरदौस जहीरअहमद मुजावर या निवडणूक लढवण्यास सज्ज झाल्या आहेत. काँग्रेस पक्षाकडून (बी.सी. महिला राखीव) गटातून त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून, प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

वारसा समाजसेवेचा आणि निष्ठेचा

फिरदौस मुजावर यांना समाजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. त्यांचे सासरे आणि माजी नगरसेवक पै. रफिक मुजावर यांनी निष्कलंक चारित्र्याने आणि निष्ठेने केलेली लोकसेवा हाच त्यांचा मुख्य आधार आहे. त्यांचे पती, काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते जहीरअहमद मुजावर यांनीही सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. या कुटुंबाच्या जनसेवेचा वारसा आता फिरदौस मुजावर समर्थपणे पुढे नेणार आहेत.

विकासासाठी मी वचनबद्ध ! 

प्रभाग क्र. ६ मधील सद्यस्थितीवर भाष्य करताना सौ. मुजावर म्हणाल्या की, “या प्रभागात आजवर म्हणावा तसा विकास झालेला नाही. मूलभूत सुविधांचा अभाव असून नागरिक समस्यांनी त्रस्त आहेत. माझे आजोबा पै. महमद हुसेन मुश्रीफ व वडील पै. इकबाल संडे यांचा धार्मिक आशीर्वाद घेऊन मी राजकारणात सक्रिय झाले आहे. केवळ प्रभागच नव्हे, तर संपूर्ण मिरज शहराच्या विकासासाठी मी वचनबद्ध आहे.”

सुशिक्षित उमेदवाराला संधी देण्याचे आवाहन

नव्या बदलासाठी आणि नव्या उमेदीने राजकारणात प्रवेश करणाऱ्या फिरदौस मुजावर या एक सुशिक्षित उमेदवार आहेत. सुशिक्षित प्रतिनिधीच प्रशासकीय कामात आणि विकासकामात गती आणू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

“माझा प्रभाग, माझी भूमिका” या ब्रीदवाक्यासह त्यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले असून, प्रभागातील नागरिकांनी एका नव्या आणि पारदर्शक नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!