पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी श्रीरंग नाना चव्हाण यांची निवड


पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी श्रीरंग नाना चव्हाण यांची निवड

पुणे दि. 30/10/2025 :महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी यांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या ऐतिहासिक काँग्रेस भवन पुणे येथे पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते श्रीरंग नाना चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी सदस्य ज्येष्ठ मार्गदर्शक जेष्ठ काँग्रेस नेते उल्हासदादा पवार, देविदासजी बन्साळी, महाराष्ट्र प्रदेश खजिनदार सचिव ऍड अभय छाजेड यांच्या हस्ते पदग्रहण संपन्न झाले.

आज या पदग्रहण सोहळ्या प्रसंगी पुणे जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्र प्रदेश चे निरीक्षक, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आज पदग्रहण सोहळा पुणे काँग्रेस भवन ग्रामीण कार्यालयामध्ये संपन्न झाला.

आज या पदग्रहण सोहळ्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य ज्येष्ठ नेते उल्हास दादा पवार बोलताना म्हणाले आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने भाग्याचा दिवस आहे कारण १९८४ मध्ये आजच्या दिवशी ओरिसामध्ये भाषण करत असताना इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की या भारत देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी माझ्या शरीरातील प्रत्येक रक्ताचा थेंब हा महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी मला माझ्या जीवाचं बलिदान द्यावं लागलं तरीही मी मागेपुढे पाहणार नाही आणि दुसऱ्याच दिवशी त्यांची निर्घृणपणे हत्या झाली. त्याचबरोबर आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येचा दिवस. जे भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची पुण्यतिथी ज्या ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जातात. अशा दोन महान विभूतींची साक्ष देणारा असा हा ऐतिहासिक दिवस. याच दिवशी ह्या नेत्यांचे स्मरण करुन हा पदग्रहण स्विकारुन पुणे जिल्ह्यातील तळागाळामध्ये प्रत्येक घराघरांमध्ये प्रत्येक माणसापर्यंत काँग्रेस पक्ष घेऊन जाण्याचं अभिवचन नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी सर्व उपस्थितांना दिले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अॅड. अभय छाजेड बोलताना म्हणाले की पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये प्रत्येक विधानसभेनुसार, तालुक्यानुसार प्रत्येक निरीक्षक नेमून जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण, नगरपंचायत, नगरपालिका यात होणाऱ्या सर्व निवडणुका या लढवल्या जातील आणि ग्रामीण भागातील नवीन चेहरे या निवडणुकीमध्ये देण्याचं आवाहन अभय छाजेड यांनी याप्रसंगी केले .

आजच्या या पदग्रहण सोहळ्या वेळी महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी नारायण आंबेकर, प्रशांत सुरसे, भाऊ शेट्टी , सुनिल नाईकरे पाटील, शंकरराव दांगट, कौस्तुभ गुजर, मामा खांदवे, आकाश मोरे, सोपान म्हस्के, सुनील असवलीकर, सौ वंदना सातपुते, किसान काँग्रेसचे चंद्रकांत गोरे, गणेश ढोणे, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी पालक संघ अध्यक्ष डॉ विक्रम गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा. सचिन दुर्गाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन भास्कर तुळवे यांनी केले.

अॅड. अभय छाजेड

९८२२०२३४२९

सोबत फोटो


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!