अग्रलेख: सत्तेचा पाषाण आणि जनतेचा टाहो! लेकीबाळींच्या आरोग्याशी हा जीवघेणा खेळ कशासाठी?


अग्रलेख: सत्तेचा पाषाण आणि जनतेचा टाहो! लेकीबाळींच्या आरोग्याशी हा जीवघेणा खेळ कशासाठी?

पुणे | मुख्य संपादक: मेहबूब सर्जेखान

“ज्यांच्या डोक्यात सत्तेची हवा जाते, त्यांच्या कानाखालची हवा काढण्याचे काम ही जनताच करत असते!” सध्याच्या राज्यकर्त्यांनी आणि प्रशासकीय पांढरपेशींनी कोवीडच्या नावाखाली जो काही सुलतानी हैदोस घातला होता, त्याला पुण्याच्या करारी मातीने अखेर चोख उत्तर दिले आहे. ‘अवेकन इंडिया मुव्हमेंट’च्या वीर लढवय्यांनी सत्तेच्या मस्तीला जो सुरुंग लावला आहे, तो पाहून आज आंधळ्या-बहिऱ्या प्रशासनाचे धाबे दणाणले नसतील तरच नवल!

तो २०२१ चा काळ आठवा! जिकडे तिकडे ‘मास्क’ नावाचा फास आणि ‘लस’ नावाची सक्ती! ज्या बापाने आपल्या लेकीला शाळेसाठी, रेल्वे प्रवासासाठी केवळ सरकारी कागदाच्या एका तुकड्यासाठी (सर्टिफिकेट) लसीकरण केंद्रावर नेले आणि तिथून तिचे प्रेतच घरी आले, त्या बापाच्या डोळ्यातील अश्रूंना सरकारी परिपत्रकाची किंमत काय? पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या वेशीवर जेव्हा डॉ. सलीम आळतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी फतव्यांची आणि गुलामीच्या मास्कची होळी करण्यात आली, तेव्हा ते केवळ कागद जळत नव्हते, तर जनतेच्या मनातला वणवा पेटला होता!

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेला निर्देश म्हणजे या आंदोलनाचा आणि सामान्य माणसाच्या जगण्याच्या अधिकाराचा मोठा विजय आहे. अ‍ॅड. निलेश ओझा, अ‍ॅड. सौ. दिपाली ओझा, डॉ. सचिन पेटकर आणि विनायक रायकर या झुंजार कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या पायऱ्या चढून जो लढा दिला, तो केवळ ३५ मृतांच्या न्यायासाठी नव्हता, तर या देशातील प्रत्येक श्वासाच्या स्वातंत्र्यासाठी होता. ससून रुग्णालयासमोर साखर वाटून साजरा झालेला ‘कोवीड मुक्ती दिन’ ही या जुलमी सत्तेच्या अंताची नांदी होती.

पण राज्यकर्त्यांनो, तुमचा हा राक्षसी हव्यास अजून संपला नाही का? कोवीडच्या नावाखाली जनतेला वेठीस धरले आणि आता तुमची वाकडी नजर आमच्या निरागस बालकांवर पडली आहे? १४ वर्षांच्या कोवळ्या कळ्यांना ‘HPV Vaccine’ च्या नावाखाली लसीचे प्रयोग करण्यासाठी तुम्ही वापरणार असाल, तर हा महाराष्ट्र गप्प बसणार नाही. डॉ. सलीम आळतेकर यांनी सरकारला भर चौकात विचारलेला सवाल आजही हवेत घोंघावतोय– “जर या लसीचे दुष्परिणाम झाले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? तुमचे सरकार की ही औषध कंपन्यांची टोळी?”

येणाऱ्या गुढीपाडव्याला कोल्हापूरच्या ऐतिहासिक भूमीत, राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर जो क्रांतीचा एल्गार होणार आहे, तो या सत्तेचे ‘मटकी’ फोडल्याशिवाय राहणार नाही. ज्या शाहूंनी रयतेला मायेची ऊब दिली, त्यांच्याच समोर उभे राहून ही जनता आता तुमची ही सुलतानी सक्ती गाडून टाकणार आहे!

‘प्रेस मीडिया लाईव्ह’चा रोखठोक इशारा:

“लक्षावधी लोकांचे प्राण घेणारी सक्ती आणि त्यानंतरचा हा बनाव आता थांबवा! माणसाच्या रक्ताचे पाणी करायला सत्तेचा पाषाण लागतो, पण लक्षात ठेवा, त्याच रक्ताचा जेव्हा महापूर होतो, तेव्हा मोठेमोठे गड-किल्लेही वाहून जातात. सावध व्हा, हा महाराष्ट्र आता पेटून उठला आहे!”

 

 


इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

43
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!