मोबाईल सोडून मैदानी खेळांकडे वळा; अशोका शिक्षण संस्थेच्या ३० व्या क्रीडा महोत्सवात सुहास जांभळे यांचे आवाहन”


मोबाईल सोडून मैदानी खेळांकडे वळा; अशोका शिक्षण संस्थेच्या ३० व्या क्रीडा महोत्सवात सुहास जांभळे यांचे आवाहन”

इचलकरंजी : प्रतिनिधी : “शालेय जीवनात यश आणि अपयश पचवण्याची खरी ताकद खेळाच्या मैदानातून मिळते. आजच्या मोबाईलच्या युगात मुला-मुलींनी मैदानी खेळांकडेही तितकेच लक्ष देणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुहास जांभळे यांनी केले.

अशोका शिक्षण संस्थेच्या ३० व्या वार्षिक शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन नुकतेच दिमाखात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती सुशांत खरात, संचालक सचिन जांभळे, युवा नेतृत्व जयदीप जांभळे, इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रियाताई बेडगे, शहर जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी शिंदे (नाना), डी. एम. माने शैक्षणिक संकुलाचे चेअरमन दशरथ माने, सामाजिक कार्यकर्ते हुसेन जमखंडी, सामाजिक कार्यकर्त्या मनाली नंदुरकर उपस्थित होते.

क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे सुशांत खरात यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहणाने झाली. यावेळी कुमारी गौरी कोष्टी हिने सर्व खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. त्यानंतर खो-खो, कबड्डी आणि धावण्याच्या शर्यतींचे औपचारिक उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यशवंतांचा गौरव

यावेळी वर्षभरात देश, राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सुहास जांभळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच हिरा राम हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेंद्र सपकाळ यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा महामंडळाच्या कौन्सिल पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल कोरवी सर, करपे सर, बर्गे सर, उत्तम गडदे सर, पटेल सर व दादा गडदे सर यांचाही सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवर

या सोहळ्याला शाहीर इंगळे, आनंदा वाजे (बापू), नारायण ताम्हनेकर (काका), निहाल कलावंत, पिंटू आंबोलकर, अशोका स्कूलचे मुख्याध्यापक पाटील सर, अशोक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भापकर मॅडम, बाल मंदिरच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम, परिसरातील सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक हिरा राम हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेंद्र सपकाळ यांनी केले. सूत्रसंचालन कथाकथनकार कृष्णात करपे यांनी केले, तर आभार अशोक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक बागसार यांनी मानले.

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!