ग्लोबल महाराष्ट्र रत्न “जीवन गौरव” पुरस्कार अब्दुल कय्यूम यांना जाहीर


ग्लोबल महाराष्ट्र रत्न “जीवन गौरव” पुरस्कार अब्दुल कय्यूम यांना जाहीर

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी

‘साप्ताहिक उज्ज्वल महाराष्ट्र’च्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘ग्लोबल महाराष्ट्र रत्न पुरस्कार’ सोहळ्यात यंदाचा मानाचा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कय्यूम यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार उज्ज्वल महाराष्ट्रचे मुख्य संपादक हसन शाह यांनी अधिकृतपणे जाहीर केला.

अब्दुल कय्यूम हे गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेक संघटनांच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

‘युवाशक्ती पत्रकार संघ’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा दिला असून, त्यांच्या प्रयत्नांतून १५ पत्रकारांना शासनाकडून स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून मान्यता मिळवून देण्यात यश आले आहे. तसेच ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातूनही पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी आंदोलने व निवेदने देत शासन दरबारी ठाम भूमिका मांडली आहे.

 ते मा.हज समिती सदस्य आहेत. वीस वर्षांपासून ‘साप्ताहिक औरंगाबाद युवा’चे संपादक म्हणूनही त्यांनी पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा ९ मे २०२६ रोजी, मौलाना आझाद रिसर्च सेंटर, टी.व्ही. सेंटर रोड, छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी १२ वाजल्यापासून आयोजित करण्यात आला आहे. ‘मातोश्री समृद्धी प्रतिष्ठान’ व ‘जे बी शेठ ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या घोषणेमुळे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातून अब्दुल कय्यूम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!