शिवाजीनगर पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाची कारवाई
गजानन शिरगावे :
इचलकरंज पंचक्रोशितील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या नदिघाट येथील रेणुकामाता मंदिरातील झालेल्या धाडसी चोरीचा गुन्हा अवघ्या २४ तासात उघड, शिवाजीनगर पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाची कारवाई चोरी करण्यासाठी वापरलेली मोटर सायकल, चोरीस गेलेली रोख रक्कम, तसेच डी.व्ही. आर. मशीन, मंदिरचे कुल्प तोडण्यासाठी वापलेली साधने असा ३९०० ०/-रुपये किंमतीचा मुहेमाल जप्त करण्यात आला
थोडक्यात हकिकत :- वरील तारखेस वेळ्ी व ठिकाणी पंचगंगा नदी घाट येथील रेणूका मंदिराच्या गर्भगृहातील लोखंडी शटरचे लोखंडी खुट कट करुन कुलूप तोडून तसेच लोखंडी साखळीचे कुलूपतोड्न आत प्रवेश करुन फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने अज्ञात इसमाने वरील वर्णनाचा माल चोरुन नेलेबाबत यातील फिर्यादी यांनी दिले फि्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहें
संदर मंदिर चोरी अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाच्या टीमने घटनेचे गांभी्य ओळखुन तसेच पंचक्रोशितील कित्येक भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या रेणुका मंदिरात चोरी झालेने अंत्यंत वेगाने व कशल्याने तपास करत असताना सदरचा गुन्हा हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी श्रेयस दिपक पोळ व त्यांचे साथीदारांनीच केला असलेची गोपनीय बातमी प्राप्त झाली. वरील दोन्ही संशयीतांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता वरील दोन्ही आरोपींनी सदरची चोरी केली असलेबाबत कबूली दिली. त्याप्रमाणे तपासात आरोपींकडून त्यांनी मंदिरातुन चोरी केलेली रोख रक्कम तसेच डी. व्ही. आर. त्यांचेकडून जप्त करणेत आलेला अस्न त्यांचेकडे मंदिर चोरी अणुशंगाने अधिक तपास सुरु आहे त्यांचेकड्ून आणखीन गुन्हे उघडकीस येणेची शक्यता आहे. वरीस गुन्ह्याचा पुढील तपास मपोसई उर्मिला खोत हे करीत आहेत.


























