इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक: आज २०१ तर आतापर्यंत एकूण ३६३ अर्जांची विक्री
इचलकरंजी (प्रतिनिधी): इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेण्याकरिता इच्छुकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. आज, बुधवार दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी दिवसभरात विविध प्रभाग समिती कार्यालयांमधून एकूण २०१ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज झालेल्या अर्ज विक्रीचा प्रभागनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे:
आजची प्रभागनिहाय अर्ज विक्री:
प्रभाग समिती कार्यालय अ: ७९ अर्ज
प्रभाग समिती कार्यालय ब: ४९ अर्ज
प्रभाग समिती कार्यालय क: २७ अर्ज
प्रभाग समिती कार्यालय ड: ४६ अर्ज
एकूण आजची विक्री: २०१ अर्ज
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून आजअखेर (२४ डिसेंबर) एकूण ३६३ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. दरम्यान, अर्ज विक्रीचा ओघ वाढलेला असतानाच, आज एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आज दाखल अर्जांची संख्या ‘निरंक’ आहे.
निवडणुकीच्या या रणधुमाळीमुळे राजकीय वातावरण तापू लागले असून, पुढील काही दिवसांत अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेलाही वेग येण्याची शक्यता आहे.
– मिडिया व संपर्क व्यवस्थापन, इचलकरंजी महानगरपालिका


























