पिंपरी येथे राष्ट्रीय काँग्रेस व पुरोगामी संघटनेच्या वतीने भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन व निषेध व्यक्त.

– पिंपरी दि.:- काॅंग्रेस भवन मध्ये घुसून कांग्रेस नेत्यांच्या हल्ला प्रकरणी पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समोर कांग्रेस व पुरोगामी संघटनेच्या वतीने भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भाजपाचा विरोध करण्यात आला यावेळी विविध प्रकारचे बैनर हातात घेऊन घोषणाबाजी द्वारे जोरदार हल्लाबोल करत दि. २४ रोजी चौकात आंदोलन करण्यात आला.
काँग्रेसचे प्रांतातध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा विपर्यास करत सपकाळ यांना विरोध करण्यासाठी पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन वर हल्ला केला दगडफेक केली आणि काल भाजपच्या विरोधात सातत्याने आणि सत्याने बाजू मांडणारे हनुमंत पवार यांच्यावर भाजपच्या गुंडांकडून हल्ला करण्यात आला या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारका समोर पिंपरी चौक येथे काँग्रेस पक्ष आणि शहरातील विविध पुरोगामी संघटनांनी संयुक्तरित्या भाजप विरोधी निषेध आंदोलन केले. याप्रसंगी भाजप विरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या, हातामध्ये विविध फलक व मथळे लिहलेले बॅनर्स हातात घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. “हम सब हनुमंत पवार” , “विचारांची लढाई विचारांनी लढा” , “विचाराला हिंसेने थांबवता येत नाही” , “जेवढे हल्ले तेवढा आवाज बुलंद” , अशा मथळ्याचे फलक बैनर कार्यकर्त्यांच्या हातामध्ये होते.
यावेळी भाजपावर निशाणा साधत काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, या भ्याड आल्यांवरून भाजपची घबराट उघड झाली आहे, काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यावर आणि काँग्रेस प्रवक्तांवर होत असलेल्या हल्ल्याने हे स्पष्ट दिसून येते आहे की भाजप ही आपली सत्ता जाईल परिवर्तन होईल या भीतीने घाबरून गेली आहे, म्हणून अशा परिवर्तनाची ताकत असलेल्या आणि सत्य समोर आणून भाजपचा खरा चेहरा उघड करणाऱ्या गोष्टींना ते तीव्र स्वरूपाचा विरोध करत आहेत वास्तविक पाहता भाजप आरएसएस आणि त्यांच्या मनुवादी संघटना कधीच सरळ सरळ लढाई लढू शकत नाहीत, ते कपटाने, धोक्याने, दग्याने, दिशाभूलीने कायम काम करतात, हनुमंत पवार यांच्याशी चर्चेमध्ये टिकण्याची हिंमत भाजपचे नेत्यांमध्ये नसल्याने त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी त्यांना घाबरवण्यासाठी हा प्रकार केला असल्याचे, तसेच अशा हल्ल्याने खचून न जाता उलट अजून जोमाने पवार आणि काँग्रेसचे कार्यकर्ते कामाला लागतील असे टिकास्त्र बनसोडे यांनी यावेळी केले.
“मारुती भापकर” म्हणाले, “लातो के भुत बातो से नही मानते” या शहरातील सामाजिक चळवळ अतिशय सक्रिय आहे या ठिकाणी महापुरुषांच्या बाबत चुकीचे वक्तव्य केल्या बाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांना शाही फेक आंदोलनां द्वारे निषेध केला होता, कधी कधी परिस्थिती पाहता “लातो के भूत बातो से नहीं मानते ही भूमिका देखील घेतली गेली पाहिजे” , भाजप विरोधी राहुल गांधी सक्षम पणे लढत आहेत सर्वांनी त्यांना साथ देण्यासाठी एकत्र यावे अशी गरज सध्या देशात निर्माण झाली आहे. यापुढील काळात जसास तसे उत्तर देण्याची तयारी ठेवा, या प्रकरणी भाजपाचा आम्ही जाहीर निषेध करतो असे ते म्हणाले.
ज्येष्ठ समाजसेवक आणि पुरोगामी चळवळीचे नेते मानव कांबळे म्हणाले, काँग्रेस भवन आणि हनुमंत पवार हल्ला या घडलेल्या घटना अतिशय अन्यायकारक आणि चीड निर्माण करणाऱ्या आहे की सत्य समोर आणले म्हणुन जीवघेणा हल्ला करायचा आणि दुसऱ्या बाजूला लहान लहान मुलींना शोषणासाठी वापरले जाते जीव घेतला जातो. त्या ठिकाणी एपस्टीन फाईल्स मध्ये अशा लोकांच्या बरोबर या नरेंद्र मोदी चे नाव आहे आणि हा नरेंद्र मोदी यांचा नेता आहे. त्या विषयावर ही सर्व गप बसतात हे मानवता शून्य कृती आहे. या अशा माणुसकी हीन काम करणाऱ्या लोकांची संघटना संस्था तिला भारतीय जनता पक्ष असं नाव दिलेला आहे. महात्मा गांधींच्या खुनाच्या कटा मध्ये सहभाग घेतला. त्यांचे आम्ही विरोध करणारच, आम्ही शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंना मानतो आम्ही राजश्री शाहूंना मानतो म्हणून आमची वैचारिक लढाई आहे मात्र त्यात पराभव होत असल्याने ते दहशतीचा मार्ग घेत आहेत मात्र हेच त्यांना अधिक जोमाने संपुष्टात आणेल संविधान जिंकेल मनुवाद हरेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी अपना वतन संघटनेचे सिद्दिक शेख, जितेंद्र छाबडा, संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रवीण कदम, ॲड. अशोक धायगुडे, संदेश पीटर जगताप, समरीन कुरेशी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यु दहितुले, मारुती भापकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव अशोक मोरे आणि मानव कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली.
आंदोलनाचे आयोजन आणि प्रास्ताविक नरेंद्र बनसोडे यांनी केले. याप्रसंगी पुरोगामी चळवळीचे नेते ज्येष्ठ समाज सेवक मानव कांबळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अशोक मोरे, मारुती भापकर, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे शहर अध्यक्ष संजय बारी, मनीषा पवार, NSUI च्या प्रदेश सचिव शितल उबाळे, अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख, हिराचंद जाधव, नीरज कडू, प्रदीप पवार, जितेंद्र छाबडा, उमेश बनसोडे, वीरेंद्र गायकवाड, शय्यान अन्सारी, गिरीश वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




























