भारतातील प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर मुनव्वर जामा  यांनी तरुणांना व्यसनाधीनते पासून दूर राहून जीवन सुधारण्याची प्रेरणा दिली.


भारतातील प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर मुनव्वर जामा  यांनी तरुणांना व्यसनाधीनते पासून दूर राहून जीवन सुधारण्याची प्रेरणा दिली

पुण्यातील हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला

 

पुणे : शिरत ऊन नबी क्विझ कॉम्प्युटेशन  पुरस्कार वाटप सोहळ्याच्या निमित्ताने  भारतातील प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर मुनव्वर जामा यांचा दिनांक, ९ नोव्हेंबर २०२५ रोजी पुण्यात कोंढवा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (पोलिस स्टेशन समोर, कोंढवा) येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रचंत  जनसमुदाय उपस्थित होता खास करून यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभागी  झाल्या होत्या ,

 

मुनव्वर जामा  यांनी  सांगितले की कार्यक्रमासाठी मला बरेच प्रस्ताव  आले होते पण मी माझ्या  कामात व्यस्त असल्यामुळे नाकारले होते , पण या कार्यक्रमा साठी पुण्यात यावे म्हणून मुस्लिम बँकेचे व्हाईस चेअरमन व माजी नगरसेवक अँड अय्युब शेख यांनी विशेष परिश्रम घेतले त्यामुळे मला पुण्यात यावे लागले

सुरवातीस मुनव्वर जामा यांची रॅली कौसरबाग येथून निघाली या मध्ये प्रचंड नागरिक सामील झाले होते. कार्यक्रमाच्या स्थळी पोहचताच उपस्थित असलेल्या प्रचंड जनसमुदायाने त्यांचे भव्य स्वागत केले पुणेकरानी दाखवलेल्या प्रेमाने मुनव्वर जामा भाऊक झाले.

सुरवातीस अँड अय्युब शेख यांनी आपल्या महत्वपूर्ण भाषणात उपस्थित सर्व नागरिकांचे आभार मानून मुनव्वर जामा यांचे कौतुक केले.

मुनव्वर जामा यांनी आपल्या महत्वपूर्ण भाषणात तरुणांना आणि पालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणातून तरुणांना व्यसनाधीनते पासून दूर राहून जीवन सुधारण्याची प्रेरणा दिली. या कार्यक्रमाचे आयोजनअहद फाउंडेशन पुणे यांनी केले , पुण्यातील पहिल्या कार्यक्रमाचे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले. स्वतःचा हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला.

कार्यक्रमाच्या स्थळी कॅन्टीन व पार्किंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!