रावणगांव ते मंत्रालय पायी प्रवासास निघालेल्या जैनोदीन पटेल रावणगांकर याना मुखेड येथील शेतकरी पुत्रांनी पाठिंबा दिला.
मुखेड : तालुक्यातील लेंडी धरण हे तेलंगाना व महाराष्ट्र या संयुक्त विद्यमाणे होत आहे या धरणाचे भुमिपूजन १९९६ साली झाले पण संबंधित अधिकारी यांच्या वेळकाढू पणामुळे हा धरण १९८६ साली मुळ किमत ५६ कोटी रुपये होती आज तब्बल २२०० कोटी पर्यंत जाऊन पोहचली आहे. धरणग्रस्तांच्या इतर मागण्या प्रलंबीत आसताना धरणग्रस्तांच्या बच्याच आश्या मागण्या प्रलंबीत आहेत त्या मागण्या शासन मंजुर करतील या आशेने रावणगांव ते मंत्रालय पायी प्रवासास दि.३१ रोजी निघालेले जैनोदीन पटेल रावणगांकर याना पाठींबा मुखेड येथील शेतकरी पुत्र यानी दिला.
दरम्यान मागील तिन महिन्या पर्वी दि.१८/१०/२०२५ राजी अतिवृष्टी होऊन रावणगांव व हासनाळ् हे दोन्ही गावे दिसेनासे झाले. त्यात हासनाळ येथील 6 नागरीक दगावले तर शेकडो जनावरे वाहन गेले जर तयार झालेले गेट चे दरवाजे सुरक्षित आसते तर द्वार उघडल्यावर जिवित हानी व वित्त हानी होत नव्हती. गावे घर जमीनदोस्त झाल्यामुळे कांही कुंटुबाना घर नाही की खायाला आन्न नाही आज आडिच महीने आसपास होत आहे जिल्हा प्रशासन व संबंधीत अधिकारी पहात नाहीत. गावे बेचिराख करून सुद्धा जिल्हा प्रशासन जे धरणग्रस्तांना देय आहे ते देत नाहीत म्हणून धरणग्रस्तांच्या जिव्हाळ्याचे १८ मागण्या घेऊन त्यात वहातूक भत्ता, स्थालंतरीत भत्ता, स्वच्छा पूनर्वसन, इंदीरा अवास अंतर्गत घरे बांधून द्यावे या मागण्या सह माझ्या स्वतः च्या घरांचा मावेजा न देताच जिल्हा प्रशासन माझे घर जमिनदोस्त केले. नांदेड जिल्हा प्रशासन धरणग्रस्ताचे मागण्या मंजूर करीत नाही त्यामुळे मायबाप राज्याशासन मान्य करतील या विश्वासाने रावणगांव ता. मुखेड येथून मंत्रालय मुंबई येथे न्याय मेळेल व शासन देईल या मुळे दि.३१/१०/२०२५ पासून पायी चालत आहे आसे लेखी निवेदन राज्यशासना पासून ते जिल्हा प्रशासन याना दिल्याचे माहिती मुंबई पर्यत चालत असलेले जैनोदीन पटेल रावणगांवकर पाटील यांचा आज अकरावा दिवस आहे.
रोज सकाळी 4-30 ते सायंकारळी 8-00 वाजता पर्यंत चालत आहेत त्यांनी या वयात ज्यांचे ६५ – 68 पर्यंत आहे अशा माणसाने रस्त्यावर चालत मुंबई जात असताना प्रशासन आज बारा दिवसा पासून यांची प्रश्नाची दखल घेतलेली नाही प्रशासन लवकर दखल घेऊन त्यांचे प्रश्न सोडवावे आसे लेखी निवेदन शेतकरी पुत्र गिरीधर पाटील. केरूरकर, प्रदिप पाटील हासनाळकर, बजरंग पाटील पाळेकर, संतोष पाटील इंगोले सह इतर शेतकरी पुत्र दिले आहेत.





























