दर्पण दिनानिमित्त खालापूर येथे पत्रकारांचा सन्मान; सुनील पाटील यांना ‘तुळशी वृंदावन’ देऊन गौरविले


दर्पण दिनानिमित्त खालापूर येथे पत्रकारांचा सन्मान; सुनील पाटील यांना ‘तुळशी वृंदावन’ देऊन गौरविले

खालापूर (प्रतिनिधी): मराठी वृत्तसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रभर ‘पत्रकार दिन’ तथा ‘दर्पण दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. याच दिवसाचे महत्त्व अधोरेखित करत खालापूर तालुक्यात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा गौरव करण्यात आला.

समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असलेल्या पत्रकारितेचा सन्मान करण्यासाठी, प्रेस मीडिया लाईव्हचे रायगड जिल्हा उपसंपादक सुनील पाटील यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना ‘तुळशी वृंदावन’ भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या वेळी प्रेस मीडिया लाईव्ह च्या  निर्भीड पत्रकारिताचे कौतुक करण्यात आले 

मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:

श्री. उत्तम भोईर: सामाजिक कार्यकर्ते (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)

माजी ग्रामपंचायत सदस्य श्री विलास म्हात्रे आगरी सेना उपतालुकाप्रमुख खालापूर

श्री. देविदास पाटील: माजी सभापती, पनवेल

श्री. दिलीप ठोंबरे: माजी सरपंच (टेंबरी), माजी ग्रामपंचायत सदस्य तथा आगरी सेना उपतालुकाप्रमुख, खालापूर

यावेळी बोलताना मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. समाजात जनजागृती करण्याचे आणि सामान्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार अत्यंत निष्ठेने करत आहेत, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या छोटेखानी परंतु उत्साहपूर्ण सोहळ्याने पत्रकार दिनाचा आनंद द्विगुणित झाला. सुनील पाटील यांनी या सन्मानाबद्दल सर्व मान्यवरांचे आभार मानले.

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!