महात्मा फुलेंच्या खानवडीत रंगणार ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ सोहळा; विविध क्षेत्रांतील महिलांचा होणार सन्मान

स्त्री शिक्षणाची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीचे औचित्य साधून, महात्मा फुले यांचे मूळ गाव असलेल्या खानवडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मा. श्री. आनंद पाटील (IAS) भूषविणार असून, पद्मश्री डॉ. अनिल राजबंशी (संचालक, निंबकर ॲग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्युट) यांच्या शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये 

पुरस्काराचे स्वरूप: शैक्षणिक, प्रशासकीय, सामाजिक, औद्योगिक, वैद्यकीय, पत्रकारिता आणि क्रीडा क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी सन्मान.

प्रमुख पाहुणे: मा. श्री. गजानन पाटील, IAS (सीईओ, जिल्हा परिषद पुणे).

विशेष उपस्थिती : मा. संचिता कुमार, AVP (HR & CSR, फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स).

आयोजक: समस्त ग्रामस्थ, खानवडी (ता. पुरंदर).

खानवडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या सोहळ्याचे मुख्य उद्दिष्ट सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाला दाद देणे हे आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकारी, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा प्रेरणादायी ठरेल.

या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन खानवडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!