कुरुंदवाड सर्वपक्षीय कृती समितचा गंभीर आरोप : यड्रावकराचे पाण्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात राजकारण


कुरुंदवाड सर्वपक्षीय कृती समितचा गंभीर आरोप : यड्रावकराचे पाण्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात राजकारण

कुरुंदवाड ( दै. अप्रतिम ):

कुरुंदवाड पाणी पुरवठ्याचा प्रश्न एका महिन्यात मार्गी लावतो अशी घोषणा म्हणून यड्रावकरांनी मे महिन्यात उपोषण स्थळाला भेट दिल्यानंतर केली होती. आज सहा महीने होत आले पण त्यांना पाणी पुरवठा योजना सुरू करता आली नाही. असा गौप्यस्फोट करत कुरुंदवाड पाणी पुरवठा प्रश्नात यड्रावकरांनी राजकारण केले असून ते खोटारडे असल्याचा सणसणाटी आरोप काल राजू आवळे यांच्यासह कृती समितच्या सदस्यांनी केला कुरुंदवाड शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न हा पाणी प्रश्न आहे यासाठी नगरपालिकेसमोर गेली सहा महिने साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवली आहे. त्यांच्याकडून हा पाणीपुरवठा मंजूर होणार नाही अशी मानसिकता तयार. आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोर जनहित याचिका दाखल केली आहे अशी माहिती कुरुंदवाड शहर सर्वपक्षीय कृती समितीचे प्रमुख राजू आवळे व प्रफुल्ल पाटील यांनी आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत दिली यावेळी. मुंबई उच्च न्यायालयाचे वकील अँ.धैर्यशील सुतार हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना आवळे पाटील म्हणाले पाणी प्रश्नासाठी आम्ही अनेक आंदोलने केली. गेल्या दहा ते अकरा वर्षापासून या पाणीपुरवठा योजनेचे काम रेंगाळले आहे. यासाठी आम्ही विविध पक्ष संघटना यांच्या वतीने गेल्या सहा महिन्यापासून साखळी उपोषणाच्या आंदोलन सुरू आहे.

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन एक महिन्यात हा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले होते. मात्र आज तगायत त्यांनी तो शब्द पाळलेला नाही. तथापि गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले नागरी विकास पायाभूत सुविधा या योजनेतून 50 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याकडून मंजूर करून घेणार आहोत लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल हा प्रश्न मीच सोडवणार असे त्यांनी ठामपणे सांगितले होते. आम्ही न्यायालयात गेल्यानंतर यांना साक्षात्कार कसा झाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान ऍड सुतार म्हणाले जनतेला पाणी देणे हा घटनात्मक अधिकार असताना शुद्ध पाणी मिळत नाही हे दुर्दैव आहे. या अधिकाराची पायमल्ली होत असल्याने जनहित याचिकेच्या माध्यमातून आम्ही न्यायालयाकडे धाव घेतली आहे. येत्या 6 नोव्हेंबर रोजी याबाबत सुनावणी होणार असून. यामध्ये आम्हाला निश्चित न्याय मिळेल असा आमचा विश्वास आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ.एस के माने तसेच कृती समितीचे तानाजी आलासे,जितेंद्र साळुंखे,अभिजीत पवार, राजू बेले,एन डी पाटील, अण्णासो जामदार, अनिकेत बेले, नायकु ढेरे,महावीर आवळे, केशव देशपांडे,चंद्रकांत गावडे  विजयकुमार माने सुरेश हलवाई व सर्व सदस्य उपस्थित होते


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!