लोकसेवेचा वारसा अन् विकासाची जिद्द ; सौ. अलका हेमंत (काका) बधे यांचा प्रभाग ४० मधून उमेदवारीचा एल्गार!

प्रेस मीडिया लाईव्ह:
पुणे : कोंढवा बुद्रूक – येवलेवाडी परिस शाश्वत विकासासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. प्रभाग क्रमांक ४० मधील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ. अलका हेमंत (काका) बधे यांनी जनसेवेचा दृढ संकल्प करत आपल्या निवडणूक मोहिमेचे रणशिंग फुंकले आहे.
गेल्या अनेक दशकांपासून हेमंत (काका) बधे यांनी या भागात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. सुख-दुःखात धावून जाणारा हक्काचा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. तोच सेवाभावी वारसा पुढे नेत, सौ. अलका बधे यांनी आता विकासाच्या जिद्दीने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग ४० ला केवळ विकासाच्या नकाशावर आणणे नव्हे, तर तो आदर्श प्रभाग बनवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.
त्रिशुक्तीचे बळ आणि विकासाचा ‘रोडमॅप’ सौ. अलका बधे यांच्यासोबत काँग्रेसच्या या समर्थ पॅनेलमध्ये श्री. रोहित साळवे (अ) आणि श्री. दादाश्री कामठे (ड) हे देखील खांद्याला खांदा लावून निवडणूक लढवत आहेत. पाण्याचा गंभीर प्रश्न, महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि हाय-मास्ट दिवे, तरुणांच्या हाताला काम आणि परिसराची स्वच्छता या चतुःसूत्रीवर या पॅनेलने आपला भर दिला आहे.
प्रभागाच्या परिवर्तनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन “आम्ही केवळ निवडणुका जिंकण्यासाठी नाही, तर लोकांची मने जिंकण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र आलो आहोत,” अशी भावना सौ. अलका बधे यांनी व्यक्त केली. उद्या होणाऱ्या या शुभारंभ सोहळ्याच्या निमित्ताने प्रभागातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या परिवर्तनाच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन बधे परिवार व काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.


























