पुण्यातील कायदेतज्ज्ञ ॲड. अन्सारी अफसाना तस्लिम यांना ‘राणी लक्ष्मीबाई २०२५’ पुरस्कार प्रदान
मिरज: प्रतिनिधी सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘प्रेस मीडिया लाईव्ह’च्या वतीने वकिली क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ॲड. अन्सारी अफसाना तस्लिम यांना ‘राणी लक्ष्मीबाई २०२५’ या मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी मिरज येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते महमूद रफीक मांगुरे यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.
ॲड. अन्सारी अफसाना तस्लिम या पुणे येथे वकिली क्षेत्रात कार्यरत असून, त्या विशेषतः गरीब आणि पीडित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढा देत आहेत. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची आणि कायदेशीर क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. त्या पुण्याचे प्रसिद्ध फौजदारी वकील ॲड. साजीद ब. शाह यांच्या असोसिएशनच्या सदस्य आहेत.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून लियाकत सर्जेखान, विजय चव्हाण (पुणे), गोरखनाथ चिखलकर, सौ. अनिता पाटील, ज्येष्ठ संपादक डी.एस. शिंदे, सांगली जिल्हा प्रतिनिधी अशोक मासाळ, अनिस जमादार, इचलकरंजी ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बाबासो राजमाने आणि यासर सौदागर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील १०० गुणवंतांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
ॲड. अन्सारी अफसाना तस्लिम यांच्या या यशाबद्दल प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांच्यासह कायदेशीर आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.


























