धायरी-खडकवासला परिसरात महायुतीला खिंडार ; राहुल घुले, शिवाजी मते, सोनाली पोकळे यांचा ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश


धायरी-खडकवासला परिसरात महायुतीला खिंडार ; राहुल घुले, शिवाजी मते, सोनाली पोकळे यांचा ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश

पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून, खडकवासला मतदारसंघातील शिवणे-खडकवासला-धायरी प्रभागातील दिग्गज नेत्यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. श्री. राहुल घुले, श्री. शिवाजी मते आणि सौ. सोनाली पोकळे यांनी आज मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन हातावर ‘शिवबंधन’ बांधले.

बड्या नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

या महत्त्वाच्या पक्षप्रवेशावेळी पुण्याचे शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक स्थानिक नेते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने माजी नगरसेवक प्रशांत बधे, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास मते, तसेच महेश मते, गोकुळ करंजावणे आणि राजेंद्र करंजावणे यांसारख्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

खडकवासल्यात शिवसेनेची ताकद वाढणार

या पक्षप्रवेशामुळे धायरी आणि शिवणे परिसरात शिवसेनेची (UBT) ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे बोलले जात आहे. मातोश्रीवर झालेल्या या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत केले आणि भागातील जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले.

“पुणे शहरात शिवसेनेचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आजच्या या पक्षप्रवेशामुळे खडकवासला मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठे बळ मिळणार आहे.” — गजानन थरकुडे (शहरप्रमुख, शिवसेना UBT)

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!