मिरजेत रंगणार ‘प्रेस मीडिया लाईव्ह’चा सहावा वर्धापन दिन सोहळा; महाराष्ट्रातील ‘रत्नांचा’ होणार गौरव


मिरजेत रंगणार ‘प्रेस मीडिया लाईव्ह’चा सहावा वर्धापन दिन सोहळा; महाराष्ट्रातील ‘रत्नांचा’ होणार गौरव..!

पुणे : पत्रकारिता क्षेत्रात आपल्या आक्रमक आणि विश्वासार्ह बातम्यांनी देशपातळीवर ओळख निर्माण करणाऱ्या व ‘क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नाव कोरलेल्या ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ या वृत्तसंस्थेचा सहावा वर्धापन दिन सोहळा येत्या २९ डिसेंबर २०२५ रोजी मिरजेत मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आणि विविध क्षेत्रांत ‘रत्न’ म्हणून चमकणाऱ्या उल्लेखनीय व्यक्ती व संस्थांचा विशेष गौरव केला जाणार आहे.

या वेळी  इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघटनेचा  सन्मान करण्यात येणार आहे..

दिग्गजांची उपस्थिती आणि सोहळ्याचे आकर्षण

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ‘रपाटा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचे अभिनेते मा. महमदरफिक मांगुरे सर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबतच कला, साहित्य, प्रशासन आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक नामांकित चेहरे या व्यासपीठावर उपस्थित राहून विजेत्यांचा उत्साह वाढवणार आहेत.

प्रमुख उपस्थिती:

मा. पद्मजा खटावकर (प्रसिद्ध अभिनेत्री)

सौ. पूर्णिमा शिंदे (आकाशवाणी, मुंबई)

मा. यासर सलीमभाई सौदागर (सचिव, अल फताह इंग्लिश मीडियम स्कूल, मिरज)

मा. डी. एस. शिंदे (ज्येष्ठ संपादक, घर प्रमुख मिरज)

मा. बाबासो  राजमाने पत्रकार  पुढारी  (इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघटना)

मा. मिलिंद देशपांडे (ज्येष्ठ पत्रकार, दैनिक लोकमत)

मा. रितेश सुभाष कुंभार (महसूल विभाग)

मा. मनोज रामचंद्र चव्हाण (कला क्रीडा समन्वयक विभाग प्रमुख, पुणे)

मा. गोरखनाथ चिखलकर ज्येष्ठ कामगार नेते इचलकरंजी

कर्तृत्वाला मिळणार मानाचा मुजरा

या सोहळ्यात केवळ व्यक्तींचाच नव्हे, तर समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या संस्थांचाही सन्मान होणार आहे. यामध्ये सामाजिक संस्था, अपंग व दिव्यांग कल्याणासाठी झटणाऱ्या संस्था, अनाथाश्रम आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या शाळा-महाविद्यालयांचा समावेश आहे.

मुख्य संपादक महेबूब सर्जेखान यांनी सांगितले की, “डिजिटल मीडियाच्या प्रवासात प्रेक्षकांनी दिलेली साथ मोलाची आहे. हा सोहळा पूर्णपणे प्रायोजकांच्या सहकार्याने होत असून, चांगल्या कामाला दाद देणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे.”

नियोजन आणि सहकार्य

या भव्य सोहळ्यासाठी पश्चिम महाराष्ट्राचे संपादक श्रीकांत कांबळे  व अशोक मासाळ पत्रकार यांनी विशेष परिश्रम घेतले असून, इचलकरंजी फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी असोसिएशनचे यासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर म्हणून ‘न्यूज रोजाना चॅनल पुणे’ काम पाहत आहे.

वेळ आणि स्थळ विसरू नका:

तारीख: २९ डिसेंबर २०२५

वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ०२:००

ठिकाण: चांदबी लॉन, कुपवाड रोड, मिरज.

या सोहळ्याला मिरज व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!