आमदारांच्या ‘मंगलाष्टका’ आणि लोकशाहीचा ‘रामनाम’!


प्रिंट’ असो वा ‘डिजिटल’, पत्रकारांमध्ये दुजाभाव नको; पिंपरीत डॉ. देसाईंनी झाडले माध्यमांचे वाभाडे

पिंपरी: (प्रतिनिधी) “आज एखादा आमदार लग्नात ‘मंगलाष्टका’ म्हणतो याची जर हेडलाईन होत असेल, तर लोकशाहीचा ‘रामनाम’ सत्य व्हायला वेळ लागणार नाही! पत्रकारितेचे फालतुकरण थांबवायचे असेल, तर माध्यमांमधील भेदाभेद गाडून टाकावा लागेल. प्रिंट असो वा डिजिटल, पत्रकार हा पत्रकारच असतो; त्यांच्यात भेदभाव करणे हे लोकशाहीला घातक आहे,” अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. हेमंत देसाई यांनी व्यवस्थेवर सडकून टीका केली.

अखिल मराठी पत्रकार संस्था महाराष्ट्र राज्य संलग्न पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित “पीसीएमसी टॉप १० पुरस्कार २०२६” वितरण सोहळ्यात डॉ. देसाई बोलत होते. यावेळी त्यांनी माध्यमांच्या बदलत्या स्वरूपावर आणि पत्रकारांच्या हक्कांवर भाष्य केले.

डिजिटल माध्यमांचा सन्मान करा:

आजच्या युगात माहिती पोहोचवण्याचे काम डिजिटल मीडिया अत्यंत वेगाने करत आहे. अशा वेळी प्रिंट आणि डिजिटल असा भेदभाव करणे चुकीचे आहे. डॉ. देसाई म्हणाले की, “आज मिडीया कॉर्पोरेटच्या दावणीला बांधला गेला असून, जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी सत्ताधाऱ्यांची भलामण केली जात आहे. पत्रकारांनी निर्भीडपणे लिहायला हवे, मग ते माध्यम कोणतेही असो.”

पत्रकारांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या – बापूसाहेब गोरे:

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी पत्रकारांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. “पत्रकारांच्या प्रश्नांवर कोणीही उहापोह करत नाही. लोकप्रतिनिधींनी त्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

चुका निदर्शनास आणून द्या – महापौर रवी लांडगे:

“मी मस्तवणार नाही, आमच्याकडून चुका झाल्यास पत्रकारांनी त्या अवश्य निदर्शनास आणून द्याव्यात,” असे स्पष्ट मत महापौर रवी लांडगे यांनी व्यक्त केले. तर उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी साहित्य आणि संस्कृती टिकवण्याचे आवाहन केले.

मान्यवरांचा गौरव:

या सोहळ्यात पत्रकारिता क्षेत्रातून अविनाश चिलेकर, शासकीय अधिकारी मकरंद निकम, कामगार नेते शशिकांत झिंजुर्डे, डॉ. राजेंद्र फिरके, मनीषा राठोड यांच्यासह १० मान्यवरांना ‘पीसीएमसी टॉप १०’ पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले, तर सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अमोल डंबाळे, बाबू कांबळे, विनय लोंढे, युनुस खतिब आणि पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

 

 


इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

43
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!