मोहसीन शेख यांची तोफ धडाडली; खुर्च्या उबवणाऱ्यांना आता जनतेचा ‘आवाज़’ ऐकू येईल का?

पुणे ज्या कोंढव्याच्या गल्ल्यांमध्ये आजवर आश्वासनांचे नुसतेच धूर निघत होते, त्याच नवाजीश पार्क चौकात काल काँग्रेसचा एक तरुण वाघ डरकाळी फोडत होता! नाव त्याचे मोहसीन शेख! पण आवाज साक्षात अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या सामान्य जनतेचा! कालची सभा ही केवळ सभा नव्हती, तर सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्यांना हादरे देणारा तो एक राजकीय भूकंप होता!

सत्तेचा माज उतरवणारच.!
“राजकारण म्हणजे काय तुमच्या बापाची जहागिरी आहे काय?” असा खडा सवाल टाकत मोहसीन शेख यांनी जेव्हा भाषणाला सुरुवात केली, तेव्हा समोर बसलेल्या हजारो हातांनी टाळ्यांचा जो कडकडाट केला, त्या आवाजात विरोधकांचे मनसुबे पार वाहून गेले. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा आणि अकार्यक्षमतेचा पाढा वाचताना मोहसीन यांचा आवाज एखाद्या धारदार तलवारीसारखा तळपत होता. सामान्य माणसाला पाण्यासाठी वणवण करायला लावणारे आणि तरुणांच्या हाताला काम देऊ न शकणारे हे सत्ताधारी म्हणजे लोकशाहीला लागलेली वाळवीच आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली.
कोंढव्याचा बुलंद आवाज!
मोहसीन शेख यांचे भाषण म्हणजे जणू धगधगते अग्निकुंडच! स्थानिक विकास, नागरी सोयी आणि दुर्लक्षित समाजाच्या हक्कांवर बोलताना त्यांनी जे मुद्दे मांडले, त्याने उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला. “आम्ही केवळ मतं द्यायला जन्माला आलेलो नाही, तर हक्क मागायलाही आम्हाला येतं,” हा त्यांचा इशारा म्हणजे आगामी निवडणुकीच्या रणसंग्रामाची नांदीच ठरली आहे.
कार्यकर्त्यांचा महासागर!
नवाजीश पार्कचा तो परिसर ‘काँग्रेस जिंदाबाद’च्या घोषणांनी असा काही दणाणून गेला होता की, जणू पुण्याच्या मातीत परिवर्तनाचे नवे वारे वाहू लागले आहेत. मुस्लिम बहुल भागातील जनतेने दिलेला हा प्रतिसाद पाहून विरोधकांच्या छातीत धडकी भरली नसेल तरच नवल! मोहसीन शेख यांच्या रूपाने काँग्रेसला एक असा झुंजार नेतृत्व मिळालं आहे, जे केवळ बोलत नाही, तर समोरच्याला सळो की पळो करून सोडतं.
थोडक्यात काय, तर कालच्या सभेनं हे सिद्ध केलंय की— कोंढव्याचा राजा कोण? तर जो जनतेच्या दुःखावर फुंकर घालेल आणि अन्यायाविरुद्ध छाती काढून उभा राहील तोच! आणि तो चेहरा म्हणजे मोहसीन शेख!


























