उत्तर महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर; अ‍ॅड. सलमान शाह यांना प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय आदर्श वकील’ पुरस्कार प्रदान


उत्तर महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर; अ‍ॅड. सलमान शाह यांना प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय आदर्श वकील’ पुरस्कार प्रदान

 

मिरज : जळगाव व धुळे जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आपल्या वकिली कौशल्याने ठसा उमटवणारे तरुण विधीज्ञ अ‍ॅड. सलमान ब. शाह यांना मिरज येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात ‘राष्ट्रीय आदर्श वकील २०२५’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रेस मीडिया लाईव्हच्या वतीने त्यांच्या वकिली आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत हा गौरव करण्यात आला आहे.

मान्यवरांची उपस्थिती: हा पुरस्कार सोहळा २९ डिसेंबर २०२५ रोजी मिरज येथे पार पडला. प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते महमूद रफीक मांगुरे यांच्या हस्ते अ‍ॅड. सलमान शाह यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान, लियाकत सर्जेखान, विजय चव्हाण (पुणे), गोरखनाथ चिखलकर, सौ. अनिता पाटील, ज्येष्ठ संपादक डी. एस. शिंदे, सांगली जिल्हा प्रतिनिधी अशोक मासाळ, अनिस जमादार, इचलकरंजी ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बाबासो राजमाने आणि यासर सौदागर आदी मान्यवर उपस्थित होते.

पीडितांना न्याय मिळवून देण्यात अग्रसेर: अ‍ॅड. सलमान शाह हे गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर महाराष्ट्रात वकिली क्षेत्रात कार्यरत आहेत. केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर एक सामाजिक कर्तव्य म्हणून ते गरीब, वंचित आणि पीडित लोकांना कायदेशीर न्याय मिळवून देण्यासाठी लढा देतात. त्यांच्या याच सामाजिक कार्याची आणि कायदेशीर योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

पुण्यातील नामांकित असोसिएशनशी संबंध: अ‍ॅड. सलमान शाह हे पुण्याचे प्रख्यात फौजदारी वकील अ‍ॅड. साजीद ब. शाह यांच्या असोसिएशनचे सदस्य असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये काम केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांनी विशेष कौतुक केले. या सोहळ्यात देशभरातील विविध क्षेत्रांतील १०० गुणवंतांचाही गौरव करण्यात आला.

अ‍ॅड. सलमान शाह यांना मिळालेल्या या राष्ट्रीय पुरस्कारामुळे जळगाव आणि धुळे जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत असून, वकिली क्षेत्रात त्यांचे कौतुक केले जात आहे.

 

 

 

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!