रिपाई (सचिन खरात गट) पक्षाच्या वतीने टॅक्स ऑफिसवर हल्ला बोल आंदोलन 


रिपाई (सचिन खरात गट) पक्षाच्या वतीने टॅक्स ऑफिसवर हल्ला बोल आंदोलन 

टॅक्स अधिकारी यांनी नियमबाह्य पद्धतीने मूळ मालकाचे नाव काढून नवीन खरेदीदाराच्या नावाची नोंद करणाऱ्या अधिकाऱ्यावर तातडीने कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.. फिरोज मुल्ला(सर) प्रदेश मुख्य संघटक

पिंपरी चिंचवड शहर (सांगवी).. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(खरात गट)पक्षाच्या वतीने टॅक्स ऑफिस विभाग सांगवी येथे निराधार महिला श्रीमती ज्योती डी. करुणाकरन यांना न्याय मिळवून देण्यासाठी हल्ला बोल धरणे आंदोलन फिरोज मुल्ला (सर)प्रदेश मुख्य संघटक यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले सबंधित अधिकाऱ्यांना पक्षाच्या शिष्ट मंडळाच्या वतीने मागण्यांनचे निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रदेश सचिव, पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय चोपडे, पश्चिम महा. अध्यक्ष, पुणे शहर अध्यक्ष राजाभाऊ कांबळे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष राहुल वडमारे, सौ. शकीलाताई मुल्ला, अल्पसंख्यांक विकास महासंघाचे अध्यक्ष रफिक कुरेशी, स्वभामानी रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष जीवन घोंघडे, रिपब्लिकन नेते आनंद घेडे,आदी प्रमुख नेते कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलनाचे आयोजन संदीपभाऊ शेंडगे अध्यक्ष छ.शि. म.संघांचे यांनी केले

श्रीमती ज्योती डी. करुणाकारन या महिलेच्या पतीचे निधन झाल्या नंतर कोर्टाच्या आदेशानुसार 2022मध्ये टॅक्स ऑफिस मध्ये टॅक्स पावतीवर नाव लावण्यात आले होते आणि त्यांनी आलेल्या टॅक्सची भरलेली पावती सुद्धा त्यांच्या नावाने पिंपरी चिंचवड महानगरपालिके कडून ज्योती डी. करुणाकारन यांना देण्यात आली होती त्यानंतर त्यांच्या फ्लॅटची विक्री खरेदी त्यांच्या परस्पर 2023मध्ये झाली आणि ज्योती डी. करुणाकारन यांना टॅक्स ऑफिस कडून कुठल्याही प्रकारची कल्पना न देता नवीन खरेदीदार कपिल हेमंत लुंकड या इसमाचे नाव लावण्यात आले याबद्दल टॅक्स ऑफिसमध्ये विचारणा केली असता उडवा उडवीचे उत्तर देण्यात आले समाधान कारक माहिती मिळाली नाही हा ऐक प्रकारे निराधार महिलेवर अन्याय आहे अशा कृत्यामुळे ज्योती डी करुणाकारन यांना राहण्यासाठी घर नाही त्यांच्या वारस हक्का पासून त्यांना वंचित राहवं लागले आहे याला जवाबदार टॅक्स ऑफिसचे अधिकारी आहेत म्हणून सबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे पिडीत निराधार महिला ज्योती डी. करुणाकारन यांचे नाव टॅक्स पावतीवर लावून त्यांचा मालकी हक्क पुन्हा मिळावा झालेला व्यहार रद्द करावा ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असे फिरोज मुल्ला सर यांनी निवेदन देताना इशारा दिला तसेच पुणे जिल्हा युवक अध्यक्ष राहुल घोडके, वाहतूक आघाडी पुणे शहर अध्यक्ष बाबा हरी सोनवणे,अकबर शेख,प्रवीण चव्हाण,जराल्ड डिसोजा, सुशांत गायकवाड, शफीक शेख, संजय येडलेल्लू इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!