तोंडात टाकताच विरघळणारे पनीर की पोटाचे वाटोळे करणारे प्लास्टिक..?  हॉटेलच्या मेनू कार्डावर आता ‘दुध का दूध आणि पाणी का पाणी’ होणार..!


तोंडात टाकताच विरघळणारे पनीर की पोटाचे वाटोळे करणारे प्लास्टिक..?  हॉटेलच्या मेनू कार्डावर आता ‘दुध का दूध आणि पाणी का पाणी’ होणार..!

हॉटेल मध्ये मिळणाऱ्या ‘पनीर’च्या नावाखाली ग्राहकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ आता थांबणार आहे. चीज आणि पनीरच्या नावाखाली ‘नॉन-डेअरी’ व भेसळयुक्त उत्पादने विकणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. दुधाव्यतिरिक्त इतर कोणत्याही घटकांपासून बनवलेल्या पदार्थाला ‘पनीर’ किंवा ‘चीज’ म्हणून विकणे आता बेकायदेशीर ठरणार आहे.

मेनू कार्डवर आता ‘सत्याचा’ स्पष्ट उल्लेख

अन्न व औषध प्रशासनाने हॉटेलचालकांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, इथून पुढे मेनू कार्डवर केवळ ‘पनीर’ असा शब्द वापरून चालणार नाही. त्याऐवजी ‘दुधापासून तयार केलेले पनीर’ असा स्पष्ट उल्लेख करावा लागेल. जर एखादा हॉटेल व्यावसायिक स्वस्त आणि बनावट ‘ॲनालॉग पनीर’ वापरत असेल, तर तसा स्पष्ट खुलासा मेनू कार्डवर करणे आता बंधनकारक आहे.

बिलावरही द्यावा लागणार पुरावा

ही नवी नियमावली केवळ मेनू कार्डपुरती मर्यादित नाही. ग्राहकाला मिळणाऱ्या बिलावरही ‘दुधाचे पनीर’ किंवा ‘पनीर ॲनालॉग’ असा उल्लेख करावा लागेल. अनेक रेस्टॉरंट्समध्ये ग्राहकांची चव आणि आरोग्य यांच्याशी तडजोड करून स्वस्त पर्यायांची विक्री केली जाते, ज्याला आता चाप बसणार आहे.

कडक कारवाईचा इशारा

पनीर हे केवळ दूध आणि ॲनालॉग घटकांपासून तयार होते. मात्र, अनेक ठिकाणी ग्राहकांना अंधारात ठेवून यातील दुसऱ्या प्रकाराची विक्री केली जाते. या फसवणुकीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने आता कडक भूमिका घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल चालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

43
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!