पुणे महानगरपालिका निवडणूक: काशेवाडी-डायस प्लॉटच्या विकासासाठी इंजिनिअर सादिक लुकडे यांची ‘दमदार एन्ट्री’


पुणे महानगरपालिका निवडणूक: काशेवाडी-डायस प्लॉटच्या विकासासाठी इंजिनिअर सादिक लुकडे यांची ‘दमदार एन्ट्री’

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, प्रभाग क्रमांक २२ (ब) काशेवाडी-डायस प्लॉट भागात आता एका उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत चेहऱ्याची चर्चा रंगली आहे. या भागाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय उराशी बाळगून तरुण इंजिनिअर सादिक लुकडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात दमदार एन्ट्री केली आहे.

सादिक लुकडे यांनी नुकताच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी परिसरातील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी

सादिक लुकडे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे, माजी आमदार मोहनदादा जोशी, अविनाश बागवे आणि शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला दावा सादर केला आहे. एक तरुण, अभ्यासू आणि तांत्रिक दृष्टीकोन असलेला उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे प्रभागातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मान्यवरांची उपस्थिती

उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून लुकडे यांना पाठबळ दिले. यामध्ये: ॲड. शाहिद अख्तर, ॲड. फय्याज शेख आरिफ काचवाला, रवी पाटोळे अमरसिंग मक्कड, जयकुमार ठोंबरे  पुष्कर आबनावे, खजिनदार सुमित राजूशेठ डांगी जुबेर दिल्लीवाला, ॲड. शाबीर खान यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विकासाचा नवा ‘ब्लू प्रिंट’

काशेवाडी, लोहियानगर आणि हरकानगर डायस प्लॉट या भागातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी एका इंजिनिअरची दृष्टी फायदेशीर ठरेल, असा विश्वास समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. सादिक लुकडे यांच्या रूपाने या भागाला एक सुसंस्कृत आणि प्रगल्भ नेतृत्व मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

 


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!