निलंबित निवडणूक कर्मचारी अस्मिता गाडीवडर यांच्या निलंबन- स्थगिती कारवाईसाठी पुण्याच्या संशोधकाची महिला आयोगास विनंती…


निलंबित निवडणूक कर्मचारी अस्मिता गाडीवडर यांच्या निलंबन- स्थगिती कारवाईसाठी पुण्याच्या संशोधकाची महिला आयोगास विनंती…

प्रेस मीडिया लाईव्ह

सध्या पुण्यात महानगरपालिकेच्या निवडणुकांचे प्रशिक्षण चालू आहे. या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ महिला अभियंता अस्मिता गाडीवडर त्यांना निवडणूक कामात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे.

कोंढवा- येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पुण्यातील संशोधक डॉ. तुषार निकाळजे यांनी माननीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई यांचेकडे श्रीमती अस्मिता गाडीवडर यांचे निलंबनाची कारवाई स्थगित करण्यासंदर्भात विनंती केली आहे डॉ. तुषार निकाळजे यांनी महिला आयोगास लिहिलेल्या पत्रामध्ये असे म्हटले आहे की महिलांच्या घरगुती, कौटुंबिक, कार्यालयीन, शारीरिक व इतर जबाबदाऱ्यांचा विचार करता या महिलेस निलंबित केल्यास त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांस याचा तोटा होईल. समजपत्र किंवा इतर नागरी सेवांच्या कारवाई कराव्यात ज्यामुळे त्यांची नोकरी जाऊन त्याचा दुष्परिणाम त्यांच्या कुटुंबावर होऊ नये. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी विनंती डॉ. निकाळजे यांनी केली आहे.

या निवेदनामध्ये त्यांनी पुण्यातील दोन घटनांचा उल्लेख केला आहे. बालगंधर्व रंगमंदिराशेजारील प्रवेशद्वारा जवळ निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत निवडणूक प्रशिक्षणाच्या ठिकाणी माननीय ज्येष्ठ मंत्री श्री. नाना पटोले यांचा वर्तमानपत्रातील उलटा फोटो लावण्यात आला होता. तसेच घोले रोड क्षेत्रीय कार्यालय,, पुणे येथील एका बोर्डवर निवडणूक अधिकाऱ्यांनी माननीय प्रकाश आंबेडकर यांचा आडवा फोटो लावण्यात आला होता. ही बाब अवमान कारक आहे. तसेच निवडणूक शिष्टाचार व आचारसंहिता यांचा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत भंग झाल्याचे निदर्शनास आणले आहे. मग या अधिका-यांवर पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक आयुक्तांनी कारवाई का केली नाही?

या निवेदनाची प्रत मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मुख्य निवडणूक आयुक्त, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त, निवडणूक आचारसंहिता कक्ष, पुणे महानगरपालिका यांना डॉ. तुषार निकाळजे यांनी दिली आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!