प्रेस मीडिया लाईव्हच्या राष्ट्रीय सोहळ्यात ‘रप्पाटा’ चित्रपटाची धूम
अभिनेता मोहम्मद रफीक मांगुरे यांच्यासाठी चाहत्यांच्या लागल्या रांगा!

मिरज : विशेष प्रतिनिधी प्रेस मीडिया लाईव्हच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त मिरज येथील चांदबी लॉन्स येथे आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात आगामी मराठी चित्रपट ‘’ रप्पाटाचे प्रमोशन अतिशय दिमाखात पार पडले. या भव्य सोहळ्याचे नेटके नियोजन प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान सर यांनी केले होते, तर डीजे किंग राम नाईक यांच्या संगीताने कार्यक्रमात विशेष रंग भरले.


दिग्गजांच्या उपस्थितीत १०० मान्यवरांचा सन्मान
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. सलीम आळतेकर, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद देशपांडे, अनिस जमादार, सांगली जिल्हा प्रतिनिधी अशोक मासाळ, पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी श्रीकांत कांबळे, सुकुमार कांबळे, रायगड जिल्हा उपसंपादक सुनील पाटील, सौ. अनिता पाटील, संपादक डी. एस. शिंदे, इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बाबासो राजमाने, लियाकत सर्जेखान आणि यासर सौदागर यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील १०० गुणवंतांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
अभिनेता मांगुरे यांच्यासाठी चाहत्यांची ‘मोबाईल नंबर’साठी रांग!
चित्रपटाचे नायक मोहम्मद रफीक मांगुरे मंचावर येताच उपस्थितांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. प्रमोशन संपल्यानंतर एक अभूतपूर्व प्रसंग पाहायला मिळाला; अभिनेता मांगुरे यांचा मोबाईल नंबर मिळवण्यासाठी चाहत्यांनी चक्क लांबच लांब रांगा लावल्या. लोकांचे हे निस्सीम प्रेम पाहून मांगुरे सर भारावून गेले. या सोहळ्यामुळे त्यांचा एक मोठा चाहता वर्ग निर्माण झाल्याचे दिसून आले.
“अहो ऐकलंत का, आपण ‘रप्पाटा’ बघायला जायचं!”
कार्यक्रमाच्या ठिकाणी महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. अनेक महिला आपल्या पतीकडे “अहो ऐकलंत का, आपण सुद्धा ‘.’रप्पाटा’ ‘ चित्रपट बघायला नक्की जायचं!” असा आग्रही शब्द देताना दिसत होत्या. यावरून घराघरात या चित्रपटाची उत्सुकता पोहोचल्याचे स्पष्ट झाले.
प्रेक्षकांची ‘भीष्म प्रतिज्ञा’
उपस्थित सर्व मान्यवर आणि हजारो प्रेक्षकांनी केवळ शुभेच्छाच दिल्या नाहीत, तर सर्वांनी एकस्वरात ‘भीष्म प्रतिज्ञा’ केली की, चित्रपट प्रदर्शित होताच आम्ही सर्वजण सिनेमागृहात जाऊन रप्पाटा’‘ पाहणारच!
[ सोहळ्याचे मानकरी आणि आयोजक ]
आयोजक: मेहबूब सर्जेखान (मुख्य संपादक, प्रेस मीडिया लाईव्ह) प्रमुख उपस्थिती: डॉ. सलीम आळतेकर, मिलिंद देशपांडे, अशोक मासाळ व इतर मान्यवर. संगीत धमाका: डीजे किंग राम नाईक. विशेष आकर्षण: अभिनेता मोहम्मद रफीक मांगुरे यांची क्रेझ आणि ” चित्रपटाचे प्रमोशन.


























