समाविष्ट 32 गावात भीषण पाणीटंचाई टँकर लाॅबी पाेसण्यासाठी आम आदमी पक्षाचा गंभीर आराेप


समाविष्ट 32 गावात भीषण पाणीटंचाई टँकर लाॅबी पाेसण्यासाठी आम आदमी पक्षाचा गंभीर आराेप

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे लाखाे नागरिकांचे हाल सुरू आहेत. तर दुसरीकडे टँकर लाॅबी पाेसण्याचे काम प्रशासन आणि त्यांचे दलाल काम करीत असल्याचा गंभीर आराेप आम आदमी पक्षाने केला आहे.

याबाबत पुणे शहर आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशाेर राम यांना निवेदन दिले आहे. समाविष्ट गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने टँकरला 48 काेटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा ठेका बंद करण्यात यावा तसेच या ठेकेदाराने टँकरने केलेल्या पाणीपुरवठ्याची चाैकशी करावी याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,
शहरा लगतच्या गावात पालिका प्रशासनाला पाणी, रस्ते, कचरा आदी समस्या दूर करण्यात अपयश आले आहे. धायरी, शिवणेसह नऱ्हे आंबेगाव,लाेहगाव आदी ठिकाणी बेकायदेशीर नळ कनेक्शन माेठ्या प्रमाणात आहे. अनेक कामगार दहा पंधरा वर्षापासून एकाच जागेवर आहेत. तत्कालीन राजकीय नगरसेवक व अधिकारी पैसे घेऊन दिलेली बेकायदा पाणी कनेक्शनही अनेक ठिकाणी माेठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अपुरे व अनियमित पाणीपुरवठा हाेत आहे. दाट लाेकवस्त्यांत अनेक ठिकाणीही चार पाच दिवसात एकदाच तर निम्म्याहून अधिक भागात पाणीही मिळत नाही. त्यामुळे बाराही महिने या भागात पाणी टंचाईची समस्या आहे. या गावातील काही साेसायट्या, तसेच ठराविक वस्त्यांत पैसे घेऊन मुबलक पाणी साेडले जात आहे. टँकर लाॅबी पाेसणान्या साठी तथाकथित समाजकंटकांवर तसेच पैसे घेऊन पाणी साेडणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्या वर कठाेर कारवाई करण्यात यावी तसेच समाविष्ट गावांतील पाणी टंचाई दूर करण्यासाठी व येणाऱ्या उन्हाळ्याचे नियोजन आवश्यक उपाययाेजना तातडीने सुरू कराव्यात अन्यथा तीव्र जन आक्राेश आंदाेलन करण्याचा इशारा आम आदमी पक्षाने दिला आहे.

यावेळी उपस्थित हाेते : श्री. धनंजजय बेनकर (पुणे शहर अध्यक्ष), श्री. किरण कद्रे (प्रवक्ता), श्री. सुनिल साैदी (सचिव), श्री. निरंजन अडागळे ( मीडिया सह संयोजक )
श्री निखिल खंदारे,युवा उपाध्यक्ष कृष्णा कपूर


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!