गावोगावी आता नशामुक्तीचा ‘सोटा’ फिरणार; ‘प्रेस मीडिया लाईव्ह’चा आरोग्य क्रांतीसाठी एल्गार..!

पुणे : आजचा महाराष्ट्र कोणत्या वळणावर उभा आहे? एका बाजूला दारूच्या पेल्यात बुडलेली तरुणाई आणि दुसऱ्या बाजूला साखरेच्या विळख्यात अडकलेला सामान्य माणूस! छत्री गहाण ठेवून दारू पिणाऱ्यांच्या आणि वात आल्यासारखे साखरेला चिटकून बसणाऱ्यांच्या या दुनियेत आता आरोग्याचा ‘नारळ’ फोडण्याची वेळ आली आहे. ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ने या दोन्ही राक्षसांचा वध करण्यासाठी ‘नशामुक्ती व मधुमेहमुक्ती अभियान’ नावाचे एक मोठे धर्मयुद्ध पुकारले आहे!
व्यसन सोडणाऱ्या नररत्नांचा होणार जाहीर गौरव..!
जे तरुण व्यसनाच्या चिखलातून बाहेर पडतील, जे नशा सोडून स्वाभिमानाने जगतील, अशा नशामुक्त तरुणांचा ‘प्रेस मीडिया लाईव्ह’तर्फे जाहीर गौरव करण्यात येणार आहे! जे चुकले पण पुन्हा सावरले, अशा धडपडणाऱ्या तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांना समाजाचे आदर्श बनवण्याचे मोठे काम आम्ही करणार आहोत. हा केवळ सन्मान नाही, तर नवजीवनाचा अभिषेक आहे!
पैसा काय कामाचा..?
आरोग्य हीच खरी श्रीमंती! अहो, आपले जीवन अनमोल आहे! हे एकदा समजून घ्या. तुमच्या आरोग्याची काळजी तुम्हालाच घ्यावी लागणार आहे. लक्षात ठेवा, आरोग्य चांगले तर सर्व काही चांगले! नाहीतर कष्टाने कमावलेला ‘पैसा’ सुद्धा औषध गोळ्यांच्या दुकानात फेकावा लागेल, तो तुमच्या उपयोगाला येणार नाही. श्रीमंतीचे बंगले आणि गाड्या आरोग्य नसेल तर स्मशानासारख्या भासतात, हे विसरू नका!
महिन्यातून एकदा प्रत्येक गावात पडणार नशामुक्तीची ‘गाज’!
नुसते केंद्र उघडून आम्ही थांबणार नाही, तर प्रेस मीडिया लाईव्हतर्फे दर महिन्याला प्रत्येक गावात नशामुक्तीचा जाहीर कार्यक्रम घेतला जाणार आहे! व्यसनाच्या अंधारात चाचपडणाऱ्या तरुणाईला प्रकाशाची वाट दाखवण्यासाठी ही एक वैचारिक क्रांती असेल. गावातला प्रत्येक माणूस निर्व्यसनी झाला पाहिजे, हा आमचा अट्टाहास आहे!
प्रतिनिधी हवेत की देवदूत..?
प्रत्येक तालुक्यात आणि गावात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा विडा अनिस जमादार यांनी उचलला आहे. ज्यांच्या अंगात सेवाभावाची ‘ऊब’ आहे, अशा मर्द गड्यांची या अभियानाला गरज आहे!

आजच संपर्क साधा: अनिस जमादार: ७७९८१०९६१२
उठा, जागे व्हा आणि या आरोग्य क्रांतीचे शिलेदार व्हा! कारण लक्षात ठेवा, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, बाकी सगळं ‘पाचोळा’ आहे!
आपला नम्र,
मेहबूब सर्जेखान
मुख्य संपादक, प्रेस मीडिया लाईव्ह, पुणे.




























