घामाचं मोल मातीमोल करणाऱ्या प्राण्यांचा बंदोबस्त करा, नाहीतर खुर्च्या खाली करा! विश्वनाथ पाटलांचा ‘वन’दरबारी निर्वाणीचा इशारा!


बळीराजाच्या स्वप्नांची राखरांगोळी करणाऱ्या वनविभागाला ‘हामु’ पाटलांनी सुनावले खडे बोल !

शिये : महाराष्ट्र ज्याला ‘अन्नदाता’ म्हणतो, त्या बळीराजाच्या रक्ताचं पाणी आज कोल्हापूरच्या लाल मातीत वन्यप्राण्यांच्या पायादळी तुडवलं जातंय! एका बाजूला अस्मानी संकट घोंगावतंय, तर दुसरीकडे वनविभागाच्या ‘सुलतानी’ कारभारानं शेतकरी हवालदिल झालाय. पण आता हा अन्याय सहन केला जाणार नाही, असा वज्रनिर्धार करून शिये जिल्हा परिषद मतदारसंघाचे बुलंद नेतृत्व, मा. श्री. विश्वनाथ उर्फ हामु विलास पाटील यांनी थेट वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या दालनात जाऊन जाब विचारला आहे.

शेतकऱ्याचा घाम की रानटी श्वापदांचे खाद्य?

शेतकऱ्याने काबाडकष्ट करून, रक्ताचे पाणी करून आणि स्वतःच्या पोटाला चिमटा काढून उभं केलेलं सोनं वन्यप्राणी एका रात्रीत फस्त करत आहेत. हे केवळ पिकांचं नुकसान नाही, तर एका कष्टकरी बापाच्या काळजाचा तुकडा आहे! ही स्वप्ने राखेत मिळत असताना सरकारी अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत का? असा जळजळीत सवाल आज हामु पाटलांनी प्रशासनाला विचारला.

पंचनामे करा, नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा!

विश्वनाथ पाटलांनी आज करवीरच्या वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांना (RFO) दिलेले पत्र म्हणजे केवळ कागदाचा तुकडा नसून, तो तळपत्या निखाऱ्यासारखा इशारा आहे. “शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तातडीने नुकसानीचे ‘पंचनामे’ झालेच पाहिजेत आणि शासन नियमानुसार दमडी न् दमडी नुकसान भरपाई बळीराजाच्या पदरात पडलीच पाहिजे,” अशी गर्जना त्यांनी केली. जर अधिकार्यांना कर्तव्य पार पाडता येत नसेल, तर त्यांनी त्या खुर्च्यांवर बसण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

जोपर्यंत हक्क मिळत नाही, तोपर्यंत लढा सुरूच!

“शेतकरी संकटात असताना आम्ही शांत बसणार नाही. जोपर्यंत प्रत्येक बाधित शेतकऱ्याला त्याचा न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा हा पाठपुरावा आणि लढा सुरूच राहील!” असा शब्द त्यांनी शिये मतदारसंघातील जनतेला दिला आहे.

शिये परिसरातील शेतकऱ्यांनी हामु पाटलांच्या या आक्रमक भूमिकेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले असून, आता वनविभागाची पाचावर धारण बसली आहे. बळीराजाच्या हक्काची ही ठिणगी आता वनविभागाच्या दरबारी मोठे वादळ निर्माण करणार, हे निश्चित!

 

 


इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

43
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!