सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात ‘प्रेस मीडिया लाईव्ह’चे कार्य उल्लेखनीय; अभिनेते महमद रफीक मांगुरे यांच्याकडून गौरव
मिरजेत राष्ट्रीय पुरस्कार सोहळा संपन्न; श्रीकांत कांबळे यांची पश्चिम महाराष्ट्र संपादकपदी निवड



मिरज (प्रतिनिधी): “पत्रकारिता केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित न ठेवता, सामाजिक जबाबदारीचे भान राखून ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ने केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. कोविड काळात विद्यार्थी आणि पालकांसाठी त्यांनी दिलेले शैक्षणिक योगदान डिजिटल मीडियात क्रांती घडवणारे आहे. या संस्थेच्या कार्याचा सर्वांनी आदर्श घ्यावा,” असे प्रतिपादन प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते महमद रफीक मांगुरे यांनी केले.

पुणे येथील प्रसिद्ध वृत्तसंस्था ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त मिरज येथे आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी संस्थेच्या क्रेडेन्स बुक ऑफ WORLD RECORD’ मधील नोंदीबद्दल आणि त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला.

मान्यवरांची मांदियाळी
या सोहळ्यासाठी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून लियाकत सर्जेखान , डॉ. सलीम आळतेकर, विजय चव्हाण (पुणे), गोरखनाथ चिखलकर, सौ. अनिता पाटील, ज्येष्ठ संपादक डी. एस. शिंदे, , सांगली जिल्हा प्रतिनिधी अशोक मासाळ , अनिस जमादार, इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बाबासो राजमाने आणि यासर सौदागर आदि मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील १०० गुणवंतांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
ठळक वैशिष्ट्ये (चौकट)
महत्त्वाची नियुक्ती: श्रीकांत कांबळे यांची ‘प्रेस मीडिया लाईव्ह’च्या पश्चिम महाराष्ट्र संपादकपदी घोषणा.
पुस्तकाचा गौरव: डॉ. तुषार निकाळजे लिखित ‘अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी’ या त्रैभाषिक पुस्तकाचे विशेष कौतुक.
जागतिक विक्रम: डिजिटल मीडियातील क्रांतीबद्दल क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद.
चित्रपट प्रमोशन: अभिनेते महमद रफीक मांगुरे यांच्या ‘रप्पाटा’ चित्रपटाला उस्फूर्त प्रतिसाद.
लेखक डॉ. तुषार निकाळजे व संपादक मेहबूब सर्जेखान यांचे कौतुक
प्रेस मीडिया लाईव्हने कोविड काळात डॉ. तुषार निकाळजे लिखित ‘अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी’ हे मार्गदर्शक पुस्तक इंग्रजी, उर्दू व हिंदी अशा तीन भाषांत प्रकाशित केले. हे पुस्तक जगातील सर्व विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरल्याबद्दल लेखक डॉ. तुषार निकाळजे व संस्थेचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. ज्येष्ठ संपादक डी. एस. शिंदे यांनी सर्जेखान यांच्या कार्याला शाबासकी दिली.
श्रीकांत कांबळे यांच्यावर नवीन जबाबदारी
याच कार्यक्रमात संस्थेच्या विस्तार आणि कामाची दखल घेत श्रीकांत कांबळे यांची पश्चिम महाराष्ट्र संपादकपदी निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
यशस्वी आयोजन
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ‘शब्दांचे जादूगर’ ज्येष्ठ पत्रकार मिलिंद देशपांडे यांनी आपल्या खास शैलीत केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मनोज चव्हाण, झाकीर शेख, सुकुमार कांबळे आणि प्रेस मीडिया लाईव्हच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी यावेळी ‘रप्पाटा’ चित्रपट पाहण्याचे आश्वासन देऊन सोहळ्याची सांगता केली.


























