रमाई विद्यार्थी निवास संकुल बांधकामास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांची भेट, –
धम्म सदन प्रकल्प अतिशय समाजोपयोगी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला संकल्प :- वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे

देहूरोड प्रतिनिधी – धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्था द्वारा निर्मित या संकुलाच्या उर्वरीत बांधकामास यथाशक्ती सहकार्य करणार असे मत, देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी पोलिस निरिक्षक लखनकुमार वाव्हळे उपस्थित होते.

देहूरोड पोलिस ठाण्यात रुजू झाल्या नंतर काही बुद्ध विहारांस भेटी दिल्या पण धम्मसदन येथे आज पर्यंत येण्याचा योग आला नाही अशी खंत व्यक्त करताना हा प्रकल्प अतिशय समाजोपयोगीआहे , डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला संकल्प असून अनाथ, निराधार मुलांच्या मोफत निवास, भोजन व शिक्षणाची सोय होणार आहे ही कृती अनेकांना आदर्श व अभिमान वाटणारी आहे स्वतः चे पुढे चे विचार न करता आज स्वतः चे लाखो रूपये टाकुन आपण हे प्रकल्प उभा करीत आहे या गोष्टीचा सर्वानी बोध घेतले पाहिजे आणि समाजाच्या लोकांनी या प्रकल्पाला हातभार लावला पाहिजे असे उपस्थितांना संबोधित केले याप्रसंगी विक्रम बनसोडे यांनी उपस्थित लोकांना शुभेच्छा देत म्हणाले आपापसातील मतभेद विसरून सर्वांनी संघटीत होऊन कुनितीवर मात केली पाहिजे तेंव्हाच ख-या अर्थाने स्वतः सह समाजाचा विकास होईल असे ही मत व्यक्त केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या,
याप्रसंगी देहूरोड शाखा अध्यक्ष प्रकाश कांबळे, सरचिटणीस राकेश आवाड,कोषाध्यक्ष मोहन शिंदे,संस्कार उपाध्यक्ष उत्तम हिंगे, पर्यटन उपाध्यक्ष सुदाम पवळ,धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष के एच सूर्यवंशी, कार्याध्यक्ष अमोलभाऊ नाईकनवरे,रोहन गायकवाड, पर्यटन सचिव अनुकूल गायकवाड, सुनील कांबळे, महिला कार्यकारणी पुष्पा कांबळे,निलम काकडे,आशा माने आशा गायकवाड, संगिता गायकवाड उपस्थिती होते
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या वतीने बुद्धमूर्ती वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती व गरजु धम्मसदन विद्यार्थ्यांकरीता निवासी वसतिगृहाबद्दलची माहिती पत्रक देण्यात आले. उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीरात सहभाग घेतलेल्या महिला व उपस्थित उपासक उपासिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
संस्थेचे संस्थापकअध्यक्ष के.एच.सूर्यवंशी, कार्याध्यक्ष अमोल नाईकनवरे, विश्वस्त रोहन गायकवाड, प्रकाश काबळे, उत्तम हिंगे, मोहन शिंदे तसेच महिलाध्यक्षा पुष्पा कांबळे व अन्य उपस्थित पुरुष व महिलांनी त्यांचे स्वागत केले.
राकेश आवाड, आकाश कटारे, नील गायकवाड यानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.





























