महाविद्यालया मध्ये नाविन्यपूर्ण अध्ययन -अध्यापन केंद्रांना भेटी या प्रात्यक्षिकांतर्गत शाळांना भेटी 


श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.) पेठ वडगाव महाविद्यालया मध्ये नाविन्यपूर्ण अध्ययन -अध्यापन केंद्रांना भेटी या प्रात्यक्षिकांतर्गत शाळांना भेटी 

श्री ‌बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबंप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड. पेठ वडगाव महाविद्यालयामध्ये बी.एड. प्रथम वर्ष, सेमिस्टर फर्स्ट अंतर्गत *नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापन केंद्रांना भेटी* या प्रात्यक्षिका अंतर्गत प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण शाळा *राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ढवळी* या ठिकाणी भेट दिली. या प्रात्यक्षिकाच्या भेटीमध्ये विद्यार्थ्यांनी शाळा पाहणी, परिसर, शालेय कामकाज, कार्यालयीन माहिती, भौतिक सुविधा या सर्व गोष्टींची माहिती घेतली. मुख्याध्यापक संजय पाटील सर यांच्याशी संवाद साधला. ढवळी या ठिकाणी असलेला निसर्गरम्य परिसर, खेळाची मैदाने ,ओपन जिम, अटल लॅब ,मॅथ्स स्पेशल लॅब , सर्व प्रयोगशाळा, ग्रंथालय ,कार्यालय तसेच शाळेतील अध्ययन अध्यापन पद्धती यांची पाहणी केली. सर्व शिक्षकांशी संवाद साधला व कार्यालयीन माहिती घेतली.अटल लॅब, मुलांनी तयार केलेली विशेष गणित प्रयोगशाळा याचप्रमाणे शाळा व नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापन केंद्रांना भेटी या प्रात्यक्षिकांतर्गत प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी वडगाव शहरातील नावीन्यपूर्ण शाळा *डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल पेठ वडगाव* या शाळेलाही भेट दिली. या ठिकाणीही मुख्याध्यापक डॉ. सरदार जाधव सर यांच्याशी सुसंवाद साधला. शिक्षकांशी चर्चा केली. कार्यालयीन माहिती घेतली. सर्व विशेष खोल्यांची माहिती , वर्ग अध्ययन अध्यापन प्रक्रिया, शाळेविषयीचे विविध कामकाज, तसेच भौतिक सुविधा , परिसर, वस्तीगृह या सर्व गोष्टींची माहिती घेतली. सीबीएससी पॅटर्न असलेली व पूर्णपणे डिजिटल क्लासरूमने युक्त अशी शाळा, उच्च स्तरातील सगळ्या भौतिक सुविधा, नॅशनल इंटरनॅशनल स्तरावर विविध स्पर्धांमध्ये व स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग. एनडीए साठी विशेष प्रशिक्षण. शिस्तबद्ध वातावरण प्रशस्त इमारत प्रत्येक स्तरानुसार कौन्सलिंग अशा सर्व वैशिष्ट्याने समृद्ध अशा या शाळेला विद्यार्थ्यांनी भेट दिली.

शाळांना भेट दिल्यानंतरचा विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता . महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निर्मळे – चौगुले आर.एल. यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक राबविण्यात आले.

संस्थाध्यक्ष मा. विजयसिंह माने साहेब यांचेही या प्रात्यक्षिकासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विभाग प्रमुख प्रा. चव्हाण व्ही.डी. यांचेही मार्गदर्शन लाभले.या दोन्ही शाळांना भेट देत असताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निर्मळे – चौगुले आर.एल., प्रा. सोरटे एस. के., प्रा. चव्हाण व्ही.डी. ,प्रा. सावंत ए.पी., प्रा. दराडे टी.पी., ग्रंथपाल चौगुले एस. एस., विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!