‘क्रांतिवीर लहुजी बस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान’ तर्फे भव्य कराटे शिबिराचे आयोजन !

पुणे : ‘क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान कराटे ट्रेनिंग सेंटर’च्या वतीने एक दिवसीय कराटे शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. पुणे महानगर पालिकेचे कार्यक्षम माजी नगरसेवक मा. श्री. अविनाश बागवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिर संपन्न
हे एक दिवसीय कराटे शिबिर दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित केले असून, पुणे शहरातील भावी खेळाडू आणि कराटेप्रेमींसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
स्थळ: अरुण कुमार वैद्य स्टेडियम, लहुजी क्रीडा संकुल, भवानी पेठ, पुणे. वेळ: सायंकाळी ठीक ७.०० वाजता.
या शिबिराला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात होईल.
आयोजक आणि उद्देश
या कार्यक्रमाचे आयोजन ‘क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान कराटे ट्रेनिंग सेंटर’चे प्रशिक्षक आणि कोच अली सय्यद सर यांनी केले आहे. तरुणांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, आत्म-संरक्षण कौशल्ये आणि शिस्त रुजवण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कराटे शिबिराचा लाभ घेण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






























