पुणे: वाघोली पोलिसांची मोठी कारवाई , १ किलोहून अधिक गांजा जप्त, ३ आरोपींना अटक
पुणे: शहरात अवैध धंद्यांवर कडक कारवाईचा संदेश देत, वाघोली पोलिसांनी मोठी मोहीम राबवत तब्बल १ किलो ०२ ग्रॅम (1.02 kg) गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, जप्त केलेल्या गांजासह एकूण २ लाख ६८ हजार रुपयांचा मु्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रीसाठी आणलेला हा गांजा जप्त करण्यात आला आहे. वाघोली परिसरात अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे.
गुन्हा दाखल आणि पुढील तपास
या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैजिनाथ केदार हे करीत आहेत. गांजाचा स्रोत आणि यामागे आणखी कोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस घेत आहेत.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक
सदरची यशस्वी कामगिरी मा. अपर पौलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ४, पुणे शहर, सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन, श्री. युवराज हांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकात खालील अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता:
पोलीस अधिकारी: पोलीस निरीक्षक (गुन्हे) आसाराम शेटे, पोलीस उप निरीक्षक मनोज बागल आणि पोलीस उपनिरीक्षक संदिप करपे. अंमलदार: बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी च्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, आणि गहिनाथ बोयणे.




























