मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी गॅस गळती मुळे वाहतूक ठप्प
१९ तास उलटूनही अद्याप वाहतुक सुरळीत नाही आणखी ४ ते पाच तास लागण्याची शक्यता, तर पर्यायी मार्ग चा वापर करावा वाहतूक पोलीसांचे आवाहन

लोणावळा दि. :- मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील आडोशी बोगद्याजवळ अत्यंत ज्वलनशील प्रोपलीन गॅस टँकर वाहनचालकाचा ताबा सुटल्याने वाहन पलटी झाल्यानें वाहतूक विस्कळीत झाले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही
गॅस टँकर पलटी झाल्याने टॅंकर मधुन गॅस गळती होत असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.घटनेची माहीती मिळताच महामार्ग पोलीस,आयआरबी, देवदूत यंत्रणा, हेल्पलाईन फाऊंडेशन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे,१९ तास उलटूनही अद्याप मार्ग मोकळा झालेला नाही आणखी ४ ते पाच तास वाहतूक सुरळीत होण्यासाठी लागणार आहे या घटनेमुळे वाहन चालकांना खुपचं त्रास सहन करावा लागत आहे
सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने एक्सप्रेसवे आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग (एन एच- ४८) या दोन्ही मार्गांवर सुरक्षित थांबा‘ जाहीर केला आहे. टॅंकर पलटी झाल्याने या घाटात वाहनांच्या २० ते २५ किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “प्रशासनाची तातडीची कारवाई कुठलेही प्रकारचें जीवीत हानी होऊ नये यासाठी पोलीस सज्ज” .
मिळालेल्या माहितीनुसार, आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू आहे. ही गॅस गळती रोखण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी पोलिसांनी खंडाळा आणि लोणावळा घाट परिसरात वाहतूक पूर्णपणे रोखून धरली आहे. जोपर्यंत टॅंकर मधील गॅस गळती पूर्णपणे थांबत नाही आणि परिसर सुरक्षित होत नाही, तोपर्यंत हा मार्ग सुरू होण्याची शक्यता कमी आहे. “तर प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग” ..
वाहतूक कोंडीत जास्त वेळ कोणी अडकून पडु नये यासाठी प्रवाशांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांनी केले आहे: १) ताम्हिणी घाट मार्ग : पुणे → पौड → ताम्हिणी घाट → माणगाव → मुंबई (दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी उपयुक्त).२) माळशेज घाट मार्ग : पुणे → चाकण → नारायणगाव → माळशेज घाट → कल्याण/ठाणे (उपनगरांकडे जाणाऱ्यांसाठी). ३)भीमाशंकर/मंचर मार्ग : उत्तर मुंबई किंवा पालघरकडे जाणाऱ्या प्रवाशांनी या मार्गाचा विचार करावा. वाहनचालकांना पोलीसांच्या वतीने महत्त्वाच्या सूचना आणि खबरदारी घेण्याची सुचना
पर्यायी मार्गांमुळे प्रवासाचा वेळ साधारणपणे ३ ते ५ तासांनी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या वाहनात पुरेसे डिझेल पेट्रोल इंधन गैस, पिण्याचे पाणी आणि खाद्यपदार्थ सोबत ठेवावेत. तर सर्व जड वाहनांना चालकांनी जवळच्या फूड मॉल्स किंवा ढाबा रेस्टॉरंट असे सुरक्षित ठिकाणी वाहने उभी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जेव्हा वाहतूक सुरळीत होईल तेव्हा जड वाहन चालकांनी आपले वाहन पुढे घेऊन जावे असे आवाहन करण्यात आले आहे लोकांनी खाजगी वाहनांनी प्रवास न करता रेल्वेने प्रवास करावा असे रेल्वे ही आवाहन केले आहे रेल्वे ला प्राधान्य दिल्यास प्रवास अधिक सुखकर होईल असे ही म्हटले आहे. या अपघाताची मुळे अनेक वाहनचालकांनी नाराजगी व्यक्त केले आहे भरमसाठ टोल भरून देखील पार्याय मार्ग व नेहमीचे मार्गात अडथळा होऊन तासनतास रांगेत अडकून पडावे लागत आहे यामुळे जेवण खानेपीण्याचे हाल होत असल्याचे संताप व्यक्त करत आहे तर अनेक वाहनचालक आपले वाहन रस्त्यावर लावून स्वतः जेवणं बनवून खात असल्याचे सामाजमाध्यामातुन दिसतं आहे.


























