सापांना न मारता त्यांना जीवदान देत निसर्गाच्या स्वाधीन करा. :- सर्पमित्र वनिता बोराडे –

देहुरोड दि.:- नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुविख्यात सर्पमित्र सोयरे मल्टीपपर्ज फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्षा वनिता जगदेव बोराडे यांच्या कार्याची दखल घेत आज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर सेठ अगरवाल यांनी त्यांचा यथोचित सन्मान करून संस्थेच्या वतीने गौरविण्यात आला.

सर्पमित्र वनिता बोराडे यांचे देहूरोड शहरात आगमन झाल्याचे इंडिया बुक आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदीत झालेले संदीप बोयत यांनी नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वर सेठ यांना कळविले असता त्यांनी क्षणाचाही विचार न करता अतिथी देवो भव म्हणत वनिता बोराडे व पती डी भास्कर सह आज सकाळी दहा वाजता आपल्या देहूरोड बाजारपेठ कार्यालयात आदरसत्कार केले सर्व प्रथम चंद्रशेखर पात्रे यांनी सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या इत्यंभूत माहिती देताना सांगितले की वनिता बोराडे हे सुविख्यात सर्पमित्र आहेत

आता पर्यंत त्यांनी ७५ हजार सापांना पकडून निसर्गाच्या स्वाधीन केले आहे तसेच वनिता बोराडे यांना राष्ट्रपती द्रोपदी मुर्म व तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद तर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी देखील सन्मान केले आहे तर महाराष्ट्र सरकारने शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत असे वनिता बोराडे यांचे उपस्थित लोकांना परिचय करून दिले. यावेळी नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर अगरवाल यांनी वनिता बोराडे यांच्या सन्मानार्थ मनोगत व्यक्त करताना म्हणाले आज जगा मध्ये अनेक लोक पहीले आपले प्राण कसे वाचतील हे बघतात पण वनिता बोराडे हे आपले जीवाची पर्वा न करता गावोगावी जाऊन शिताफीने सर्प पकडून त्याला जीवे न मारता सर्पाला निसर्गाच्या कुशीत परत सोडून देतात यामुळे सर्पाचे तर प्राण वाचवतात सोबत गावकऱ्यांचे ही प्राण वाचवतात सर्प धरून त्यांना जीवदान देऊन एक प्रकारे निसर्ग संवर्धन चे ही काम सर्पमित्र वनिता बोराडे हे करत आहे वनिता बोराडे हे सर्पमित्र तर आहेच ते वन्यजीव निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात संरक्षण संवर्धन व संशोधनाचे काम देखील करतात तसेच ते सर्पमित्र सर्पतज्ञ व शास्त्रज्ञ देखील आहेत आतंरराष्ट्रीय स्तरावर शांतता नोबेल पुरस्कार साठी तीन वेळा नामांकित झालेल्या आहेत कार्य सन्मानार्थ भारत सरकारने डाक विभागाने छायाचित्र व नावासह त्यांचें टपाल तिकीट देखील जारी केले आहे आतापर्यंत ५१ हजार सापांना पकडून लोकवस्ती ग्रामस्थांना संकटातून बाहेर काढले व लोकांचे जीव देखील वाचविले आहे असे त्यांचा यथोचित सन्मान करताना सांगितले. यावेळी मानव आधार सामाजिक संघचे राज्य उपाध्यक्ष बाबु हिरमेठकर यांनी आपल्या संघाच्या वतीने प्रियंबल प्रदान करत शाल पुष्पगुच्छ देऊन वनिता बोराडे यांचे स्वागत केले व वनिता बोराडे हे सुविख्यात सर्पमित्र तर आहेच तसेच निसर्ग संवर्धन देखील ते करत आहेत
आज देहूरोड शहरात त्यांचे आगमनाची चाहूल लागली व त्यांच्या कार्य पाहाता मानव मानव आधार सामाजिक संघच्या वतीने त्याचा आदर सत्कार करत आहे असे मनोगत व्यक्त केले. वनिता बोराडे यांचे पती यांनी यावेळी बेटी बचाव बेटी पढाओ चे प्रणेते ईश्वर अगरवाल यांचे खुप खुप आभार मानत नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करत म्हणाले आज जगात सर्वार्थी लोक जास्त आहे मी आणी माझा म्हणून जगणारे दुनिया मध्ये खुप आहेत आज बेटी पढाओ बेटी बचाव च्या माध्यमातून सामाजिक कार्य करून अनेक मुलीचे भवितव्य साठी शिक्षणासाठी आर्थिक मदत करून आदर्श निर्माण करत आहेत सर्वात पहिले बेटी बचाव बेटी पढाओ ही योजना ईश्वर अगरवाल यांनी सुरू केले नंतर ही योजना केंद्र सरकारने देखील सुरू केले आपण सर्वांनी या गोष्टीचा बोध घेतली पाहिजे असे संस्थेचे अध्यक्ष ईश्वर सेठ अगरवाल यांच्या त्यांनी कौतुक केले सर्प मित्र वनिता बोराडे याचा आगमनाची चाहूल लागल्याने अनेक सर्पमित्र वनिता बोराडे यांची भेट घेण्यासाठी आले असता वनिता बोराडे यांनी या जगात १५४ जातीचे वेगवेगळे साप आहेत यात फक्त १४ साप विषारी आहे आणि १४ पैकी ४ साप हे अति विषारी आहेत त्यात घोणस मण्यार, नाग, धामण हे साप अति विषारी आहेत यांचा दंशाने माणूस क्षणात मृत्युमुखी पडतात पण लोकांमध्ये साप म्हटले कि जीवाचा थरकाप उडतो बीन विषारी साप चावल्यावर माणसांना काही होत नसतो पण माणसाच्या डोक्यात फक्त साप म्हणून भीती असते त्यामुळे घाबरून अनेक लोक उपचारापूर्वीच मृत्यूमुखी पडतात साप हे खरंतर शेतकऱ्यांच्या मित्र आहे निसर्गाचे साठी ही ते महत्वाचे आहेत शेतात उंदीर शिरून शेती खराब करतात या सापांन मुळे शेतीचे नुकसान होते आज अनेक सर्पमित्र साप धरण्याचे काम जीवावर बेतून करतात पण सरकार या सर्पमित्रांना कुठलेही प्रकारचे सुविधा प्रमाणपत्र किंवा जीवन वीमा सारखें सुविधा देत नाहीत लोकांचे जीव व सापाचे वाचविण्यासाठी ते नेहमी काम करतात पण कधीकधी साप चावल्यावर सर्पमित्र देखील जीव गमावत म्हणून सरकारला विनंती आहे, जसे सापाचे संवर्धन केले जाते तसे सर्पमित्रांना देखील सरकारच्या वतीने मानधन व योजना सुरू करून त्यांना ही सन्मानित करावे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मंगेश मनोहर रागिणवाल, सर्पमित्र योगेश गायकवाड, आशिष गायकवाड, मोझेस दास, अरूण जगताप, इंद्रपालसिंग रत्तू, अमित छाजेड, शुभम शहाणे, विजय पवार असे अनेक मान्यवर उपस्थित होते सुत्र संचलन चंद्रशेखर पात्रे यांनी केले तर आभार प्रकट मोझेस दास यांनी केले.




























